सासरच्या जाचातून भिवंडीत विवाहितेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:12 AM2020-11-20T01:12:56+5:302020-11-20T01:13:07+5:30

शबनूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.  पती शहजाद अन्सारी, सासरा सल्लाउद्दीन तर भावजय बिलकीस फय्याज अन्सारी ही गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

Married woman commits suicide in Bhiwandi due to father-in-law's harassment | सासरच्या जाचातून भिवंडीत विवाहितेने केली आत्महत्या

सासरच्या जाचातून भिवंडीत विवाहितेने केली आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : सासरच्या जाचाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरातच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. ही घटना भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील एका इमारतीमध्ये घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरा व भावजयीवर गुन्हा दाखल करण्यात आला.


शबनूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.  पती शहजाद अन्सारी, सासरा सल्लाउद्दीन तर भावजय बिलकीस फय्याज अन्सारी ही गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरात राहणारी शबनूर हिचा विवाह २०१२ मध्ये शेहजाद याच्यासोबत झाला होता. तेव्हापासून पती, सासरा व भावजय यांनी मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. 


शबनूर याचा विवाह झाल्यानंतर आठ वर्षे उलटली तरीही सासरच्या मंडळीकडून तिचा अविरत छळ सुरूच होता. अखेर, छळाला कंटाळून तिने १२ नोव्हेंबरला रॉकेल अंगावर ओतून स्वतःच पेटवून घेतले. या घटनेत ती ८० टक्के भाजली होती. त्यामुळे तिला भिवंडीहून जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती एवढी गंभीर होती  की, उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

वडिलांनी दिली तक्रार
या प्रकरणी विवाहितेचे वडील वहिदुजमा अन्सारी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीकडून मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी पती, सासरा, भावजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Married woman commits suicide in Bhiwandi due to father-in-law's harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.