दिराकडून होणाऱ्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 09:12 PM2018-09-28T21:12:21+5:302018-09-28T21:17:34+5:30
लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुणे : लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेने २७ सप्टेंबर रोजी आंबेगावमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी दिराला भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली आहे.
आंबेगाव-बुद्रुकमधील एका सोसायटीत राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २९ वर्षीय दिरास अटक केली आहे. आरोपी छोटी-मोठी फॅब्रिक्रेशनची कामे करतो.
आरोपीचा भाऊ आणि आत्महत्या केलेल्या महिलेचा ६ डिसेंबर २०१३ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर दोनच महिण्यात दीर तिला मानसिक त्रास देऊ लागला. विवाहापुर्वी आत्महत्या केलेल्या महिलेचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला सांगण्याची भिती दाखवत दीर तिला ब्लॅकमेल करीत होता. बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने शरीरसुखाची मागणीही केली होती.तिने यास नकार दिल्याने तो तिचा वारंवार शारीरीक व मानसिक छळ करीत होता. या छळास कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंके यांनी दिली.