होय मी अनेकांचे खून केले, ५० पर्यंत मोजले, पुढचं माहीत नाही; डॉक्टरचा धक्कादायक जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:58 PM2020-07-30T13:58:19+5:302020-07-30T14:02:20+5:30

५० पेक्षा अधिक जणांच्या हत्या करणाऱ्या डॉक्टराला बेड्या; अवैध किडनी प्रत्यारोपण केल्याचाही गुन्हा

mastermind in over 50 murder cases police arrested doctor from Delhi | होय मी अनेकांचे खून केले, ५० पर्यंत मोजले, पुढचं माहीत नाही; डॉक्टरचा धक्कादायक जबाब

होय मी अनेकांचे खून केले, ५० पर्यंत मोजले, पुढचं माहीत नाही; डॉक्टरचा धक्कादायक जबाब

Next

नवी दिल्ली: चार राज्यांमध्ये ५० हून अधिक जणांच्या हत्या करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात आरोपीनं अनेकांच्या हत्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं ट्रक आणि टॅक्सी चालकांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टराला अटक केली. चौकशीत त्यानं हत्यांची कबुली दिली. आपण ५० पर्यंत हत्या मोजल्या. मात्र त्यानंतरची मोजणी चुकली, असा धक्कादायक जबाब डॉक्टरनं दिला आहे. देवेंद्र शर्मा असं या डॉक्टरचं नाव आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेह नदीत फेकून द्यायचो. त्या नदीत मगरींची संख्या खूप होती, अशी माहिती शर्मानं पोलिसांना दिली. शर्मानं बीएमएसचा अभ्यास केला आहे. तो सध्या दिल्लीतल्या बापरोलामध्ये वास्तव्यास होता. दिल्ली पोलीस दलात निरीक्षक असलेल्या राममनोहर यांच्या पथकाला शर्माच्या ठावठिकाण्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पावरिया यांनी दिली. ६२ वर्षांचा देवेंद्र मूळचा अलीगढचा रहिवासी आहे. बिहारच्या सीवानमधून १९८४ साली बीएमएसची डिग्री घेतली. त्यानंतर जयपूरमध्ये एक दवाखाना सुरू केला, अशी माहिती शर्मानं पोलिसांना दिली.

१९९४ मध्ये एका गॅस एजन्सीची डिलरशिप मिळवण्यासाठी शर्मानं ११ लाख रुपये खर्च केले. मात्र कंपनीतल्या लोकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्यामुळे देवेंद्र शर्माचे पैसे बुडाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी देवेंद्रनं १९९५ साली अलीगढमध्ये एक बोगस गॅस एजन्सी सुरू केली. सुरुवातीला त्यानं लखनऊहून काही सिलिंडर आणि गॅस शेगड्या आणल्या. मात्र त्यानंतर त्याला सिलिंडर आणणं अवघड जाऊ लागलं. त्याचवेळी तो उदयवीर, वेदवीर आणि राजच्या संपर्कात आला. चौघे मिळून गॅस सिलिंडरनं भरलेल्या ट्रकच्या चालकांच्या हत्या करायचे. त्यानंतर ते सिलिंडर आपापल्या गॅस एजन्सीमध्ये न्यायचे आणि मेरठला नेऊन ट्रकचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करायचे.

बोगस गॅस एजन्सी चालवत असल्याच्या आरोपाखाली देवेंद्रला अटक झाली. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्यानं अमरोह्यात पुन्हा एकदा गॅस एजन्सी सुरू केली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा जामिनावर बाहेर आला. मग तो अवैध किडनी प्रत्यारोपित करणाऱ्या एका टोळीत सहभागी झाला. जयपूर, वल्लभगढ आणि गुरुग्राममध्ये त्यानं १२५ जणांच्या किडनी प्रत्यारोपित केल्या.

एका किडनी प्रत्यारोपणातून देवेंद्रला ५ ते ७ लाख रुपये मिळायचे. २००४ मध्ये गुरुग्रामच्या अनमोल नर्सिंग होमवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी किडनीचं अवैध प्रत्यारोपण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असलेल्या डॉक्टर अमितसोबत देवेंद्रलादेखील अटक झाली. त्यावेळी त्यानं चौकशीत ५० हून अधिक अधिक ट्रक चालकांच्या हत्या केल्याची माहिती दिली. यातल्या ७ प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली. तो जयपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगत होता. जानेवारीत त्याला २० दिवसांचा पॅरोल मिळाला. मात्र तो फरार झाला आणि दिल्लीत आला. प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्याआधीच तो पकडला गेला.
 

Web Title: mastermind in over 50 murder cases police arrested doctor from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.