पत्नी सोडून गेल्याच्या रागात तिघांची हत्या करणाऱ्या माथेफिरू चेतन गाला पोलीस कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 08:34 AM2023-03-26T08:34:38+5:302023-03-26T08:34:59+5:30

मुंबई : पत्नी आणि कुटुंब सोडून गेल्याच्या रागात शेजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला चढवत तिघांची हत्या आणि दोघांना गंभीर जखमी करणारा ...

Mathefiru Chetan Gala, who killed three people in anger over his wife's desertion, is in police custody | पत्नी सोडून गेल्याच्या रागात तिघांची हत्या करणाऱ्या माथेफिरू चेतन गाला पोलीस कोठडीत

पत्नी सोडून गेल्याच्या रागात तिघांची हत्या करणाऱ्या माथेफिरू चेतन गाला पोलीस कोठडीत

googlenewsNext

मुंबई : पत्नी आणि कुटुंब सोडून गेल्याच्या रागात शेजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला चढवत तिघांची हत्या आणि दोघांना गंभीर जखमी करणारा माथेफिरू चेतन गाला (५४) याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. डीबी मार्ग पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सध्या गाला कुटुंबीय तसेच प्रत्यक्षदर्शींचे याप्रकरणी जबाब नोंदवत आहेत. दोन महिन्यांपूर्वी पत्नीसोबत वाद झाल्यानंतर ती मुलांना घेऊन गालाला सोडून निघून गेली. सतत बोलावल्यानंतरही कुटुंबीय परत येत नसल्याचा राग गाला याला होता. या सगळ्यांसाठी तो शेजाऱ्यांनाच दोषी मानत होता, हे अद्यापच्या तपासात समोर आले आहे. 

त्याच रागात त्याने पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला. ज्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्या शेजारी राहणारे जयेंद्रभाई मिस्त्री (७७), ईलाबाई मिस्त्री (७०) आणि जेनील ब्रह्मभट (१८) या तिघांचा मृत्यू झाला. ग्रँट रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडाने अख्ख्या शहराला हादरवून टाकले आहे. दरम्यान, पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

सहा दिवसांपूर्वीच दुसरा चाकू खरेदी...

चेतनने यापूर्वीच एक चाकू खरेदी केला होता. याबाबत कुटुंबीयांना समजताच, त्याच्याकडून तो काढून घेण्यात आला. त्याने, सहा दिवसांपूर्वीच नवीन चाकू खरेदी करत, त्याने हा हल्ला केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Web Title: Mathefiru Chetan Gala, who killed three people in anger over his wife's desertion, is in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.