माथेरानमध्ये पर्यटक महिलेची गळा चिरून निर्घृणपणे हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 06:28 AM2021-12-13T06:28:42+5:302021-12-13T06:29:03+5:30

Crime News : महिलेचे शिर हत्या करणाऱ्याने कापून नेले.

In Matheran a tourist woman was brutally murdered police investigating | माथेरानमध्ये पर्यटक महिलेची गळा चिरून निर्घृणपणे हत्या

माथेरानमध्ये पर्यटक महिलेची गळा चिरून निर्घृणपणे हत्या

Next

माथेरान : इंदिरानगर परिसरामध्ये एका महिला पर्यटकाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेचे शिर हत्या करणाऱ्याने कापून नेले.    

माथेरानमधील इंदिरानगर परिसरात शनिवारी  एक जोडपे सायंकाळी राहण्यासाठी आले होते. लॉजच्या मालकाने त्यांची नावे नोंदवून खोली भाड्याने दिली होती. रविवारी सकाळी जेव्हा या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड पलंगाखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले. 

मृत महिलेचे आरोपीने शिर सोबत घेऊन गेल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहेत. लॉजच्या नोंदवहीत महिलेचे रुबिना बेन व सोबत असलेल्या व्यक्तीचे अमजद खान अशी खोटी माहिती भरली असल्याचे उघड झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: In Matheran a tourist woman was brutally murdered police investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.