MBA पास करूनही मिळाली नाही चांगली नोकरी, पुष्पा सिनेमा बघून बनला चंदन तस्कर आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:56 AM2022-12-21T10:56:23+5:302022-12-21T10:56:47+5:30
Crime News : असं सांगण्यात आलं आहे की, सुमितचे वडील व्यवसाय करतात. सुमितनुसार, त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं. एमबीए केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला.
Crime News : उत्तर प्रदेश पोलिसांनी लाल चंदन तस्करीच्या आरोपात सात लोकांना मथुरा येथून अटक केली. यातील एक आरोपी एमबीए केलेला निघाला. त्याचं नाव आहे सुमित दास उर्फ संजू. तो छत्तीसगढच्या कांकोरचा राहणारा आहे. असं सांगण्यात आलं आहे की, 'पुष्पा द राइज' सिनेमातून प्रेरित होऊन तो या गॅंगमध्ये सामिल झाला होता.
एसटीएफच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये दीपक उर्फ दलवीर, अजित कुमार यादव, सुमित उर्फ राम, चंद्र प्रताप उर्फ बब्बू, सुमित दास, जितेंद्र आणि रंजीत यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितलं की, वन विभागाच्या टीमसोबत मिळून चालवण्यात आलेल्या या अभियानात 563 किलो चंदन ताब्यात घेण्यात आलं. ज्याची किंमत साधारण 2 कोटी रूपये आहे.
एमबीए शिकलेला बनला तस्कर
असं सांगण्यात आलं आहे की, सुमितचे वडील व्यवसाय करतात. सुमितनुसार, त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं. एमबीए केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. पण मनासारखी नोकरी कुठेच मिळाली नाही. काही लोकांनी नोकरीची ऑफर दिली, पण तिथे काम जास्त आणि पगार कमी होता. तरीही त्याने नोकरी केली. पण नंतर सोडली. अशात घरातील लोक त्याच्यावर नोकरीसाठी दबाव टाकत होते.
‘पुष्पा’ सिनेमा बघून आली आयडिया
सुमितने पोलिसांना सांगितलं की, तो पुष्पा सिनेमा बघायला गेला होता. तिथेच त्याला आयडिया आली की, कशी न शिकता कोट्यावधी रूपयांची कमाई केली जाऊ शकते. मग त्याने अशा गॅंगचा शोध घेणं सुरू केलं जे रक्त चंदनाची तस्करी करतात. आंध्र प्रदेशातील एका गॅंगची त्याला माहिती मिळाली. तो त्यांच्याकडून रक्त चंदन उत्तर प्रदेशच्या मथुरा,-वृंदावनमध्ये आणत होता आणि तो इथे चंदन सप्लाय करत होता. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सातही तस्करांची चौकशी केली जात आहे. तस्कर चंदनाची लाकडं गोवर्धन रोडवर गुलमोहर सोसायटीमध्ये उतरवणार होते. सोबतच चंदन कोण विकत घेणार होतं याची माहिती काढली जात आहे.