परवीन तारीक व महाराज यांच्यावर ‘मोक्का’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:34 PM2020-02-18T22:34:53+5:302020-02-18T22:37:57+5:30
ड्रायफुट विकेत्याला एक कोटीच्या खंडणीसाठी दाखल केलेल्य गुन्ह्यातर्गंत ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई : खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या गॅगस्टर परवीन तारीक व सलीम महाराज यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)अतर्गंत कारवाई केली आहे. दोघेजण गुन्हे शाखेच्या ताब्यात असून ड्रायफुट विकेत्याला एक कोटीच्या खंडणीसाठी दाखल केलेल्य गुन्ह्यातर्गंत ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गॅंगस्टर एजाज लकडावाल याच्यासाठी काम करीत असलेल्या या दोघाकडून अनेक महत्वपुर्ण माहिती पुढे येत आहे. व्यापारी, विक्रेत्यांना लकडावालाच्या नावे फोन करुन धमकी देत खंडणी गोळा करीत असत. त्यामुळे ‘मोक्का’चे कलम लावण्यात आले आहे. त्यांच्याकडून धमक्या व खंडणी उकळण्यात आलेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.