दाऊद इब्राहिमच्या पुतण्याविरोधात मोक्का दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:28 PM2019-07-29T15:28:43+5:302019-07-29T15:29:14+5:30
पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या होत्या.
मुंबई - खंडणी विरोधी पथकाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल कासकरविरोधात मोक्काअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या होत्या.
बांधकाम आणि चीन, दुबईहून इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करणाऱ्या व्यावसायिकाने ही तक्रार केली होती. त्याने तीन वर्षांपूर्वी अश्फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता. त्याला अश्फाककडून १५ लाख ५० हजार रुपये येणे शिल्लक होते. त्यासाठी त्याने अनेकदा मागणी केली होती. त्यावेळी अहमद राजा अफ्रोज वधारिया याने १२ जूनला धमकीचा फोन केला होता. त्यावेळी त्याने आपण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक फहिम मचमच याचा हस्तक असल्याचे सांगून धमकावले. त्यावेळी इक्बाल कासकरचा मुलगा रिजवान याने ही त्या व्यावसायिकाला धमकावले होते. रिझवानने निकटवर्तीय असलेल्या टॉवलवालाकडून पैशाची मागणी करू नकोस, अशी धमकी त्याने तक्रारदाराला म्हणजेच टॉवलवालाच्या पार्टनरला दिली. १३ आणि १६ जूनला वधरियला आलेले हे धमकीचे दूरध्वनी त्याने दूरध्वनी रेकॉर्ड करून या तिघांविरोधात मुंबई पोलिसांना तक्रार दाखल केली. त्यावेळी गुन्हा दाखल करून दुबईवरून परतल्यानंतर अहमद अफ्रोजला अटक करण्यात होती. अहमदला मुंबई विमानतळावरअटक झाल्याची खबर डि कंपनीला लागताच रिजवान घाबरला होता. पोलीस कधीही अटक करणार या भीतीने 18 जुलैला रात्री तो मिळेल त्या विमानाने दुबईला पळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी वेळीच रिजवानला बेड्या ठोकल्या.
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्यावर मोक्का @mumbaipolicehttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2019