एमडी पावडर विक्रीसाठी आलेली दुकली जेरबंद; आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त

By अजित मांडके | Published: November 26, 2022 03:45 PM2022-11-26T15:45:34+5:302022-11-26T15:46:00+5:30

अभिषेक हा नुकताच ३०७ सारख्या गुन्ह्यात ०८ वर्ष शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

MD powder for sale dukali jereband; A large quantity of goods was seized from the accused | एमडी पावडर विक्रीसाठी आलेली दुकली जेरबंद; आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त

एमडी पावडर विक्रीसाठी आलेली दुकली जेरबंद; आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त

Next

ठाणे : एमडी पावडर हा अंमली पदार्थ विक्रीकरीता मुंब्र्यात आलेल्या अभिषेककुमार गुप्तेश्वर महतो (३२) आणि विजय बहादुर मडे (२०) या दिव्यातील दुकलीच्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून तीन लाख २१ हजारांचा  १०७ ग्रॅम एमडी या अंमली पदार्थासह, १ अग्निशस्त्र, ९ जीवंत काडतुसे आणि ३ चॉपर असा एकुण चार लाख २३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अभिषेक हा नुकताच ३०७ सारख्या गुन्ह्यात ०८ वर्ष शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मुंब्रा, वाय जंक्शन येथे दोघे एमडी हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्या दुकलीला शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत त्यांच्याकडून ३ लाख २१ हजारांचा १०७ ग्रॅम एमडी पावडर या अंमली पदार्थासह, १ अग्निशस्त्र, ९ जीवंत काडतुसे व १ चॉपर असा एकुण ४ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

तसेच अभिषेककुमार महतो याचे घरझडतीमध्ये आणखी ०२ चॉपर अशी प्राणघातक हत्यारे मिळुन आली असा एकुण ४ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १११२ / २०२२ एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ सह आर्म अॅक्ट ३, ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.  त्यांच्या ताब्यात मिळून आलेला अंमली पदार्थ, अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे व प्राणघातक हत्यारे कोठून आणली, याचा शोध सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट १ करत आहेत. 

ही कारवाई गुन्हे शाखा, युनिट  - १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक  दिपेश किणी, पोलीस हवालदार विश्वास मोटे, हरीष तावडे, दिपक जाधव, नंदकुमार पाटील, अमोल देसाई, राजेंद्र सांबरे, बाळु मुकणे, पोलीस शिपाई सागर सुरळकर, समीर लाटे यांनी केली आहे.
 

Web Title: MD powder for sale dukali jereband; A large quantity of goods was seized from the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.