तरुणाईला एमडीची क्रेझ; ११ महिन्यांत ४९२८ कोटींचे ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:08 AM2022-12-15T07:08:39+5:302022-12-15T07:09:02+5:30
एकूण कारवाईतून ड्रग्जमध्ये घातक समजल्या जाणाऱ्या एमडीकडे तरुणाईचा वाढता कल चिंताजनक असल्याचे एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या ११ महिन्यांत अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक रेकॉर्डब्रेक कारवाई करत ४ हजार ९२८ कोटी रुपये मूल्याचा ४ हजार ३६ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जप्त केलेल्यात एमडीचे प्रमाण ६१ टक्के तर, गांजा ३० आणि कोडीन मिश्रित कफ सिरपचा ८ टक्के साठा आहे. एकूण कारवाईतून ड्रग्जमध्ये घातक समजल्या जाणाऱ्या एमडीकडे तरुणाईचा वाढता कल चिंताजनक असल्याचे एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले.
५ वर्षांत १४६
आफ्रिकन जाळ्यात
गेल्या पाच वर्षांत १४६ आफ्रिकन ड्रग्ज तस्करांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
ड्रग्जचे सेवन करणाऱ्यावर कारवाईचा वेग
कोरोनाकाळ वगळता ड्रग्जचे सेवन करणाऱ्यावर वर्षाला ७ ते ८ हजार गुन्हे दाखल होतात. यावर्षी गेल्या ११ महिन्यांत ९ हजार २३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
४ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आतापर्यंत जवळपास २१ शाळांमध्ये
४ हजार विद्यार्थ्यांसह ६५ शिक्षकांना ‘ड्रग्जला नाही म्हणा’ मोहिमेअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
व्यसनमुक्ती केंद्राचा अभाव
कारवाईबरोबरच ड्रग्जच्या जाळ्यात गुरफटत चाललेल्या तरुणाईसाठीचे व्यसनमुक्ती केंद्राचाही अभाव असल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मुंबईला ड्रग्ज फ्री करण्यासाठी एएनसीकडून कारवाई बरोबर जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यासोबत डार्कवेबवरील ड्रग्जच्या खरेदी व्यवहारांबरोबर त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान आहे.
- प्रकाश जाधव, उपायुक्त, एएनसी, मुंबई