मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:24 AM2020-09-21T07:24:03+5:302020-09-21T07:24:28+5:30

बॉलीवूडमध्ये तरुण-तरुणींचे शोषण नित्याचेच असल्याचा आरोप कंगना रनौत हिने केला आहे.

‘me too’ movement was suppressed by a bunch of free and left thinking: Kangana | मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप

मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान बनवू पाहणाऱ्या तरूण-तरूणींचे शोषण नित्याची बाब आहे. अनेक दिग्गज सावजाच्या शोधातच असतात. यातील बहुतांश मंडळी तथाकथित मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीचे भाग असतात. त्याच जोरावर बॉलीवूडमधील ‘मी टू’ चळवळ दाबण्यात आल्याचा दावा अभिनेत्री कंगना रनौतने रविवारी केला.


दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात पायल घोष या मॉडेलने गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला. यानंतर सोशल मीडियात उलटसुटल चर्चेला सुरूवात झाली. अलीकडच्या काळात अनुराग कश्यपने कंगना रनौतच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. आता, पायल घोषच्या आरोपानंतर कंगनाने यासंदर्भात टिष्ट्वट केले. आपण वैवाहिक जीवनात कधीच एकनिष्ठ नव्हतो, असे विधान अनुरागने अनेकदा केले. पायल घोषसोबत त्याने जे केले ते बॉलीवूडमध्ये नित्याचे आहे. नव्याने बॉलीवूडमध्ये दाखल होणाऱ्यांचे लैंगिक शोषण करणारे पदोपदी बसलेले आहेत, असा दावा कंगनाने केला. व्हॅनिटी रूमचे दरवाजे बंद करून अश्लील चाळे करायचे, पार्ट्यांमध्ये लगट करायची, कामाच्या नावाखाली घरी धडकायचे आणि शरीर सुखासाठी दबाव तयार करायचे प्रयत्न नेहमीच घडतात, असा दावा कंगनाने केला.


कंगनाच्या टिष्ट्वटवर काही मंडळीनी ‘तेव्हा तू का आवाज उठवला नाहीस’, असा प्रतिप्रश्न केला. यावर, अशा प्रकारचे आरोप करणाºयांना कसे गप्प केले जाते, याची मला चांगली कल्पना आहे. शिवाय, ज्यांनी ज्यांनी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचे हिशोब मी माझ्या पद्धतीने चुकते केले आहेत. त्यामुळे पीडितांनाच तोंड वर करून प्रश्न विचारणाºयांकडे मदत मागण्याची मला गरज भासली नसल्याचे उत्तर कंगनाने टिष्ट्वटरवर दिले.

Web Title: ‘me too’ movement was suppressed by a bunch of free and left thinking: Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.