'जाळीदार टोपी, हातात मांस...'; हिस्ट्रीशीटर आहे अयोध्येत तणावाचा कट रचनारा महेश मिश्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:03 PM2022-04-29T17:03:53+5:302022-04-29T17:22:46+5:30
प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी ...
प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी घालून धार्मिक स्थळांवर आक्षेपार्ह पत्रके आणि मांसाचे तुकडे फेकले. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. हा कट रचणारा आरोपी हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर आधीपासूनच चार गुन्ह्यांची नोंद आहे.
कोण आहेत आरोपी?
संबंधित घटनेचा तपास घेत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर आणखी चार जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सर्वप्रथम दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. हे सर्व जण 'हिंदू योद्धा संघटने'शी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. महेश मिश्रा (मास्टरमाइंड), प्रत्यूष कुमार, नितिन कुमार, दीपक गौड, ब्रजेश पांडे, शत्रुघ्न आणि विमल पांडेय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यावर मशिदीबाहेर आक्षेपार्ह गोष्टी फेकून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हे लोक सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, असे काही करताना CCTV मध्येही दिसावे, अशी स्वतः आरोपीचीच इच्छा होती. यामुळेच त्याने संबंधित भागातील सीसीटीव्ही असलेल्या दोन मशिदींची निवड केली होती. याच बरोबर, महेश मिश्रा या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड होता. त्याने ब्रजेश पांडे नावाच्या वक्यक्तीच्या घरी यासंदर्भात प्लॅन आखला होता. एवढेच नाही, तर त्याने हे आक्षेपार्ह पत्रके लालबाग येथे छपले होते. तर आरोपी प्रत्यूष श्रीवास्तवने कुरान आणि टोपी विकत घेतली होती, असे पुलिसांनी म्हटले आहे.
याशिवाय, इतर आरोपींनी लालबागमधून मांस खरेदी केले होते. हे सामान 26 एप्रिलला घेण्यात आले आणि नंतर काश्मिरी मोहल्ला मशिदीत मांस आणि कुरान फेकण्यात आले. तसेच दुसऱ्या एका मशिदीत आक्षेपार्ह गोष्टी आणि मांस फेकण्यात आले, असेही पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे चार तक्रारी आल्या होत्या.
जहांगीरपुरीचा बदला घेण्याचा डाव! -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीचा बदला घेण्याची आरोपींची इच्छा होती. आरोपींनी म्हटले आहे, की हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरी येथे हिंसाचार झाला, यामुळेच त्यांची ईदच्या दिवशी वातावरण खराब करण्याची इच्छा होती. सध्या त्यांच्यावर आयपीसी कलम 295 आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदांतर्गत (NSA) गुन्हा नोंदवला जाईल.