५ मिनिटांत प्रेयसी अन् तिच्या पतीला संपवलं; चिमुकली म्हणाली, मामूनं अब्बू-अम्मीला मारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 07:31 PM2021-09-22T19:31:58+5:302021-09-22T19:32:54+5:30
गेल्या काही दिवसांपासून प्रियकर समीर आणि प्रेयसीचं भांडण सुरू होतं. दाम्पत्याच्या हत्येनंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली.
मेरठ – शहरात एका प्रियकरानं केवळ ५ मिनिटांत प्रेयसी आणि तिच्या नवऱ्याला मारुन टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रियकरानं आधी कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचं औषध देऊन दोघांना बेशुद्ध केले त्यानंतर धारदार शस्त्राने हत्या केली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले. मानलेला भाऊ म्हणून प्रियकर समीर प्रेयसीच्या घरी आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.
गेल्या काही दिवसांपासून प्रियकर समीर आणि प्रेयसीचं भांडण सुरू होतं. दाम्पत्याच्या हत्येनंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली. तेव्हा प्रेयसीचा मुलगा समीरला मामू बोलत होता. समीर नेहमी प्रेयसी जावेदा आणि तिच्या मुलांसाठी बाहेरुन खाण्यापिण्याच्या वस्तू आणत होता. गेल्या ६ महिन्यापासून जावेदाच्या कुटुंबाचा खर्च समीरच भागवत होता. जावेदा आणि समीर यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं स्थानिक लोकांच्या चौकशीतून बाहेर आलं.
जावेदासोबत समीरचे अनैतिक संबंध होते मग तिला का मारलं? यावर पोलीस सखोल चौकशी करत होते. तेव्हा कळालं की, जावेदाच्या घरी बाहेरच्या युवकांचे येणं-जाणं होतं. त्यावरुन समीरला राग येत होता. या विषयावरून जावेदा आणि समीर यांच्यात भांडण व्हायची तरीही जावेदानं समीरचं ऐकलं नाही. त्यानंतर समीरनं योजना बनवून जावेदा आणि तिच्या नवऱ्याचा काटा काढला. जावेदा आणि तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी समीरला केवळ ५ मिनिटं लागली. सुरुवातीला जावेदाचा पती आबादचा गळा चिरला त्यानंतर दुसऱ्या रुममध्ये मुलांसोबत झोपलेल्या जावेदालाही ठार केले. त्यावेळी जावेदाची मुलगी सोनिया उठली तेव्हा तिला उचलून आपटलं.
मामूनं अब्बू आणि अम्मीला मारलं
दाम्पत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी दोन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आरोपी समीरचा पोलीस शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले. तर मामूनं अब्बू आणि अम्मीला मारलं असं जावेदाच्या एका मुलाने पोलिसांनी सांगितले. सिटी गार्डन परिसरातील डबल मर्डरनं परिसरात दहशत माजली. एक वर्षापूर्वी जावेदा आणि समीरची भेट झाली होती. त्यानंतर जावेदाच्या घरी समीर येऊन जात असे. एकेदिवशी पती आबादनं या दोघांना पाहिलं तेव्हा जावेदानं समीर तिचा मानलेला भाऊ असल्याचं सांगितले. त्यानंतर समीर आणि आबादही चांगले परिचयाचे झाले.