धक्कादायक! बेडमध्ये ३ मुलींचे मृतदेह, आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात, घराला बाहेरून कुलूप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:42 IST2025-01-10T09:41:05+5:302025-01-10T09:42:04+5:30

पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, या पाच लोकांच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

meerut family murder five bodied found in home moin third and asma second marriage | धक्कादायक! बेडमध्ये ३ मुलींचे मृतदेह, आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात, घराला बाहेरून कुलूप...

धक्कादायक! बेडमध्ये ३ मुलींचे मृतदेह, आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात, घराला बाहेरून कुलूप...

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये गुरूवारी (दि.९) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असून त्यातील एक मुलगी तर अवघी वर्षभराची आहे. मुलींचे मृतदेह बेडच्या आत असलेल्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घराबाहेर लोकांचीही गर्दी जमली होती.

मेरठमधील लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुहेल गार्डन कॉलनीत एका घरात पाच मृतदेह पडले होते. मृतांमध्ये मोईन, आसमा आणि त्यांच्या तीन मुली अफशा (८), अजीजा (४) आणि अदीबा (१) यांचा समावेश आहे. मृत मोईन हे मिस्त्री म्हणून काम करत होते. आरोपींनी मोईन आणि आसमा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खोलीतच टाकला होता, तर त्यांच्या मुलींची हत्या केल्यावर त्यांचे मृतदेह त्याच खोलीतील बेडमधील बॉक्समध्ये ठेवले होते. यामधील लहान मुलीचा मृतदेह गोणीत भरून बेडमध्येच ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. 

दरम्यान, गुरूवारी सकाळपासून नातेवाईक आणि मोईन यांचा भाऊ त्यांना फोन करत होते. पण फोन उचलले जात नव्हते. शेजाऱ्यानेही मोईन यांच्या कुटुंबातील एकही सदस्य दिसला नसल्याचे सांगितले. त्यानंतर मोईन यांचा भाऊ घरी पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की घराला बाहेरून कुलूप लावलेले आहे. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस दरवाजाचा कुलूप तोडून आत गेले. यावेळी हे हत्याकांड सर्वांनाच धक्का बसला. 

हे हत्याकांड घडलं तिथे, सर्व सामान जमिनीवर पसरलेले होते. कपडे विखुरलेले पडले होते. खोलीत रक्तही पसरले होते.  त्यामुळे घरात दरोड्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी एडीजी डीजे ठाकूर, डीआयजी कलानिधी नैथानी, एसएसपी विपिन ताडा आणि जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा हे देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. मात्र, या पाच लोकांच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: meerut family murder five bodied found in home moin third and asma second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.