चोराचा कारनामा! मंदिरात आला, पूजा करून माफी मागितली अन् देवाची मूर्ती चोरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:14 AM2023-09-26T10:14:38+5:302023-09-26T10:15:11+5:30

मंदिरातील देवाच्या मूर्तीची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश केला. पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला.

meerut man offers prayer and steals laddu gopal idol from meerut temple | चोराचा कारनामा! मंदिरात आला, पूजा करून माफी मागितली अन् देवाची मूर्ती चोरली

फोटो - hindi.news18

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरातील देवाच्या मूर्तीची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश केला. पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला. चोरट्याचं हे कृत्य मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मेरठच्या विहार कॉलनीतील आहे, जिथे खाटू श्याम मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेली. चोर सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात आला हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने आपल्या गुन्ह्यांबद्दल देवाकडे क्षमा मागितली. यानंतर मंदिरातून देवाची मूर्ती चोरीला गेली.

राधा अष्टमीच्या आदल्या दिवशी मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस मूर्ती आणि चोराचा शोध घेत आहेत. मूर्ती जप्त करण्याबाबत महिलांनी पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला, मात्र सीसीटीव्ही फुटेज असूनही अद्याप चोरट्याचा शोध लागलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: meerut man offers prayer and steals laddu gopal idol from meerut temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.