भारताला मोठा धक्का, डॉमिनिकामधील कोर्टाने मेहूल चोक्शीला दिला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:32 PM2021-07-12T21:32:39+5:302021-07-12T21:34:03+5:30
Mehul Choksi: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे.
रोस्से (डॉमिनिका) - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीच्या (Mehul Choksi ) प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. भारतातून पळून गेलेला आणि सध्या डॉमिनिकामध्ये अटकेता असलेला व्यावसायिक मेहूल चोक्शी याला डॉमिनिकामधील न्यायालयाने जामीन दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव उपचार करण्यासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी मेहूल चोक्शी याला देण्यात आली आहे. कोर्टाने याबाबत एक संयुक्त सहमती आदेश दिला आहे. (Dominica Court grants interim bail to fugitive diamantaire Mehul Choksi on medical grounds to travel to Antigua & Barbuda)
कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मेहूल चोक्शी झूमच्या माध्यमातून रुग्णालयाच्या बेडवरून उपस्थित झाला. चोक्शीच्या कायदेशीर पथकाचे नेतृत्व त्रिनिदादचे वरिष्ठ वकील डग्लस मेंडेस करत आहेत. अन्य वकिलांनी जेना मूर डायर, जुलियन प्रीवोस्ट, जीना डायर मुनरो, वेन नोर्डे आणि कारा शिलिंगफोर्ड मार्श यांचा समावेश आहे.
मेहुल चोक्शीला दिलासा देताना कोर्टाने सांगितले की, त्याला डॉमिनिकामध्ये अवैध प्रवेश करण्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी परत यावे लागेल. वैद्यकीय चौकशीसाठी चोक्शीला कोर्टाने अँटिग्वामध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
Dominica Court grants interim bail to fugitive diamantaire Mehul Choksi on medical grounds to travel to Antigua & Barbuda. Bail granted strictly for medical treatment in Antigua. Interim bail granted till he's certified fit to travel, after that he has to return to Dominica. pic.twitter.com/BCey7gl0ED
— ANI (@ANI) July 12, 2021
जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मेहूल चौक्शीच्या प्रकरणात डॉमिनिकाच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली होती. त्यावेळीसुद्धा आरोग्याचे कारण देऊन चोक्शीन कोर्टात उपस्थित राहिला नव्हता. मागच्या सुनावणीवेळीसुद्धा तो रुग्णालयातूनच हजर झाला होता.
चोक्शीवर पीएलबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता विचारात घेऊन अँटिग्वामध्ये फरार झाला होता. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्या तो डॉमिनिका येथे पोहोचला होता. तिथे पोलिसांनी त्याला अटक केली होती.