राज बनून भेटला होता मेहुल चोकसी, गिफ्ट दिले होते नकली डायमंड; 'गर्लफ्रेन्ड' बारबराकडून मोठे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:09 PM2021-06-08T15:09:29+5:302021-06-08T15:12:53+5:30

बारबरा जराबिकाला मेहुल चोकसीची कथित गर्लफ्रेन्ड म्हटलं जात आहे. आधी मेहुल चोकसीकडून तिच्यावर आरोप लावण्यात आले होते.

Mehul Choksi friend Barbara Jarabica revealed things about Mehul | राज बनून भेटला होता मेहुल चोकसी, गिफ्ट दिले होते नकली डायमंड; 'गर्लफ्रेन्ड' बारबराकडून मोठे खुलासे

राज बनून भेटला होता मेहुल चोकसी, गिफ्ट दिले होते नकली डायमंड; 'गर्लफ्रेन्ड' बारबराकडून मोठे खुलासे

Next

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोकसी सध्या डोमिनिकाच्या तुरूंगात कैद आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात एंटीगुओहून फरार झालेले चोकसी डोमिनिकामध्ये सापडला. त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अशात सगळीकडे एका महिलेची चांगलीच चर्चा होत आहे. या महिलेचं नाव आहे बारबरा जराबिका.

बारबरा जराबिकाला मेहुल चोकसीची कथित गर्लफ्रेन्ड म्हटलं जात आहे. आधी मेहुल चोकसीकडून तिच्यावर आरोप लावण्यात आले होते. मात्र, आता बारबराने आपली बाजू मांडली आहे. इंडिया टुडेसोबत बोलताना तिने मेहुल चोकसीबाबत अनेक खुलासे केले आहेत.

बारबराने सांगितलं की, ती मेहुल चोकसीची मैत्रीण होती. मेहुलने बारबराला आपलं नाव 'राज' असल्याचं सांगितलं होतं. बारबरानुसार मेहुलने गेल्यावर्षी भेटीदरम्यान तिच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि त्याने फ्लर्ट केलं होतं. नंतर त्याने तिला डायमंड आणि ब्रेसलेट गिफ्ट दिले होते. पण ते नकली होते. (हे पण वाचा : Mehul Choksi’s girlfriend:...तेव्हा 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबरिका समोरच होती; मेहुल चोक्सीने सांगितले ती कशी वागली)

मेहुल चोकसीकडून लावण्यात आलेल्या किडनॅपिंगच्या आरोपांबाबत बारबरा म्हणाली की, तिचं याच्याशी काही देणं-घेणं नाही. तिचं नाव यात मेहुलच्या वकिलांनी आणि त्याच्या परिवाराने ओढलं आहे. जेव्हापासून हा वाद पेटला आहे, तेव्हापासून ती आणि तिचा परिवार तणावात आहे.

बारबराबाबत चोकसी काय म्हणाला?

मेहुल चोकसीला डोमिनिका  पोलिसांनी अटक केली आहे. त्याने जामिनासाठी अर्जही केला आहे. त्याने स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. मेहुल चोकसीकडून दावा करण्यात आला की, बारबरा त्याच्या शेजारी राहत होती. दोघेही सोबत वॉकसाठी जात होते.

२३ मे बाबत मेहुलने सांगितलं की, बारबराने त्याला भेटण्यासाठी सांगितलं. तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे ८ ते १० लोक होते. त्या लोकांनी मेहुल चोकसीला मारहाण केली. यादरम्यान बारबराने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. जे लोक इथे पोहोचले होते त्यांनी ते एंटीगुआ पोलीस सदस्य असल्याचे सांगितले होते आणि ते त्याला घेऊन गेले.

Web Title: Mehul Choksi friend Barbara Jarabica revealed things about Mehul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.