Mehul Choksi Girlfriend: गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करायला गेला असेल मेहुल चोक्सी; अँटिगाच्या पंतप्रधानांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:40 PM2021-05-30T19:40:14+5:302021-05-30T19:41:25+5:30

Mehul Choksi with his Girlfriend: पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिगा आणि बार्बुडा या देशांमध्ये लपला होता. मात्र, तो अचाकच गायब झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले होते. अखेरीस त्याला डॉमिनिकामध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पलायनाचे अनेक किस्से सांगितले जात आहेत.

Mehul Choksi might have taken his girlfriend on a romantic trip to Dominica and got caught; Antigua PM claims | Mehul Choksi Girlfriend: गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करायला गेला असेल मेहुल चोक्सी; अँटिगाच्या पंतप्रधानांचा दावा

Mehul Choksi Girlfriend: गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करायला गेला असेल मेहुल चोक्सी; अँटिगाच्या पंतप्रधानांचा दावा

googlenewsNext

पंजाब नॅशनल बँकप्रकरणी (PNB Scam) फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) अँटिगामध्ये राहत होता. मात्र, तो अचाकच गायब झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले होते. अखेरीस त्याला डॉमिनिकामध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पलायनाचे अनेक किस्से सांगितले जात आहेत. त्याला आणण्यासाठी भारताने खास विमानदेखील तिकडे पाठविले आहे. परंतू आता अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी त्यांच्या देशातून चोक्सीच्या गायब होण्यामागे खळबळजनक दावा केला आहे. (Antiguan Prime Minister Gaston Browne has said that diamantaire Mehul Choksi might have taken his girlfriend on a romantic trip to Dominica and got caught: Antigua News Room)


पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिगा आणि बार्बुडा या देशांमध्ये लपला होता. अँटिगा येथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल रविवारपासून बेपत्ता होता. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला होता. यानंतर तो बोटीने किंवा विमानाने डॉमिनिकाला पसार झाल्याचे सांगितले जात आहे. 


एका मुलाखतीमध्ये गैस्टन ब्राउन यांनी सांगितले की, मेहुल चोक्सीची चुकी आहे. तो कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर डोमिनिकामध्ये काही चांगला वेळ व्यतित करण्यासाठी गेला होता. तिथे त्याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला भारतात पाठविले जाऊ शकते. 



 


दुसरीकडे मेहुल चोक्सीने वकिलांच्या हवाल्याने सांगितले की, 23 मे रोजी भारतासाठी काम करणाऱ्या अँटिगाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. तसेच एका जहाजातून त्याला डोमिनिकामध्ये नेण्यात आले, तिथे त्याला अटक करण्यात आली आहे. 


चोक्सीच्या या अपहरणाचा दावा अँटिगाच्या पोलिस प्रमुखांनी नाकारला आहे. नाही चोक्सीचे अपहरण झाले आहे, नाही त्याला टॉर्चर करण्यात आले आहे. ब्राउन यांनी भारतीय़ अधिकारी विमान घेऊन चोक्सीला नेण्यासाठी डोमिनिकाला आले आहेत. त्यांच्यासोबत पुरावे आहेत. चोक्सीला पुन्हा अंटिगाकडे सोपविले तर तो इथे पुन्हा मजेत राहिल. त्याला व्यवसाय, गुंतवणुकीच्या आधारावर व्हिसा देण्यात आला होता. तो आता विरोधी पक्षांना अर्थपुरवठा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 
 

Web Title: Mehul Choksi might have taken his girlfriend on a romantic trip to Dominica and got caught; Antigua PM claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.