Mehul Choksi’s girlfriend:...तेव्हा 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबरिका समोरच होती; मेहुल चोक्सीने सांगितले ती कशी वागली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 05:04 PM2021-06-07T17:04:23+5:302021-06-07T17:06:29+5:30
Barbara Jabarica: कथितरित्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कट रचून अपहरण करत नंतर डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये मेहुलची 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबारिकाची (Barbara Jabarica) भूमिका खूप संशयास्पद आणि रहस्यमय आहे. मेहुल चोक्सीनेच आज मोठा दावा केला आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी (PNB Scam) फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) कॅरेबियन बेटांवर आहे. त्याला कथितरित्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कट रचून अपहरण करत नंतर डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये मेहुलची 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबारिकाची (Barbara Jabarica) भूमिका खूप संशयास्पद आणि रहस्यमय आहे. मेहुल चोक्सीनेच आज मोठा दावा केला आहे. (Mehul Choksi names 'girlfriend' Barbara Jabarica in alleged abduction plot in police complaint)
Mehul Choksi’s girlfriend: मेहुल चोक्सीची 'ती' रहस्यमयी हॉट गर्लफ्रेंड कोण? समोर आले फोटो
मेहुल चोक्सीने अँटिगा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये याचा उल्लेख केला आहे. मला जबरदस्तीने मारहाण करण्यात आली आणि डॉमिनिकामध्ये नेण्यात आले. यामध्ये जबरिकाचा हात आहे. एवढेच नाही तर ते मारहाण करणारे लोक अँटिगाचे पोलिस होते, असा दावा केला आहे.
गेल्या वर्षभरापासून माझे बार्बरा जबरिकाशी मित्रत्वाचे संबंध होते. 23 मे रोजी तिनेच मला तिच्या घरातून पिकअप करण्यास सांगितले होते. मी जेव्हा तिच्या घरी निघालो तेव्हा तिथे मला 8 ते 10 लोकांनी घेरले आणि मारले. हे लोक स्वत: अँटिगाचे पोलीस असल्याचे म्हणत होते. मला जबर मारहाण करण्यात आली. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकिट काढून घेतले. आम्हाला तुला लुटायचे नाहीय असे सांगत त्यांनी पैसे मला परत केले, असे चोक्सी म्हणाला.
When I was being beaten up, Jabarica didn't even attempt to help me or assist in any other way by calling for help from outside; manner in which Jabarica conducted herself clearly points that she was an integral part of this entire scheme to kidnap me: Mehul Choksi in complaint
— ANI (@ANI) June 7, 2021
जेव्हा मला मारहाण करण्यात येत होती, तेव्हा जबारिका तिथेच होती. मी तिला मदतीसाठी हाक मारली, परंतू तिने मला मदत करण्याचा किंवा कोणाला मदतीसाठी हाका मारण्याचा प्रयत्नही केला नाही. ती या वेळी ज्या पद्धतीने वागली त्यावरून या अपहरणामागे तिचा हात असल्याचे दिसत आहे, असा आरोप चोक्सीने केला.
Mehul Choksi: महाराष्ट्राची लेडी सिंघम! मेहुल चोक्सीला धडकी भरवणाऱ्या शारदा राऊत डॉमिनिकात दाखल
अँटिगा पोलिसांनी अद्याप मेहुल चोक्सीच्या पत्रावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जर तेथील पोलिसांनी यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर मेहुलच्या भारतवापसीला विलंब लागू शकतो.