माथेफिरूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, घटनेमुळे एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 02:57 PM2022-04-10T14:57:13+5:302022-04-10T15:37:14+5:30

Attack on Police : कोकिसरे येथील घटना; कर्मचारी गंभीर जखमी, संशयितावर गुन्हा दाखल

Mentally disturb man attack on a police, causing incident sensative atmostphere | माथेफिरूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, घटनेमुळे एकच खळबळ

माथेफिरूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, घटनेमुळे एकच खळबळ

Next

कणकवली / वैभववाडी: एका माथेफिरूने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला केल्याचा प्रकार कोकिसरे-नारकरवाडी येथे घडला आहे. यात संबंधित पोलिस कर्मचारी रमेश नारनवर यांच्या पाठीवर दोन गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास  घडली. याप्रकरणी संबंधित संशयित राजगुरू अंकुश देवकर (वय ३०) याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई-वडिलांसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला रुग्ण वाहिकेमध्ये बसवताना त्याने हा प्रकार केला. याबाबतची माहिती वैभववाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.


संशयित आरोपीचे शनिवारी  आई-वडिलांसोबत भांडण झाले होते. याबाबत माहिती समजल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपी हा दोन्ही हातात चाकू घेऊन फिरत होता. त्यानंतर पोलिस कर्मचारी रमेश नारनवर हे त्याला पकडण्यासाठी पुढे गेले. मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्या संशयित आरोपीला १०८ रुग्ण वाहिकेमधून अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्याचा प्रयत्न  नारनवर यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत कृष्णात पडवळ, शैलेंद्र कांबळे, हरीश जायभाय हे होते. याच दरम्यान संशयित आरोपीने नारनवर यांच्या पाठीवर चाकू हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर याच संशयित आरोपीने आपल्या वडिलांना देखील मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणी संशयित आरोपीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार व पोलीस कर्मचारी नारनवर यांच्यावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी कृष्णात पडवळ यांनी दिलेल्या तक्रारी नुसार आरोपीच्या विरोधात वैभववाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या या व्यक्तीने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Mentally disturb man attack on a police, causing incident sensative atmostphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.