निर्दयी! चुलत बहिणीच्या प्रियकराचा 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; गुप्तांगात काठी घातली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:49 PM2022-03-28T18:49:18+5:302022-03-28T18:49:57+5:30

Rape Case : पीडित तरुणी शुक्रवारी एका मत्स्यालयाजवळ स्थानिकांना आढळून आली. ती सापडली तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. 

Merciless! 11-year-old girl raped by cousin's boyfriend; Put a stick in the private part | निर्दयी! चुलत बहिणीच्या प्रियकराचा 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; गुप्तांगात काठी घातली

निर्दयी! चुलत बहिणीच्या प्रियकराचा 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; गुप्तांगात काठी घातली

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीवर तिच्या चुलत बहिणीच्या प्रियकराने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणी शुक्रवारी एका मत्स्यालयाजवळ स्थानिकांना आढळून आली. ती सापडली तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. 

ही मुलगी आता कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात तिच्या मृत्यूशी झुंज देत आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांना आढळले आणि तिच्या गुप्तांगामध्ये काठी घातली गेली होती.

हावडा जिल्ह्यातील डोमजूर येथून एका २२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्याच्या प्रेयसीला “नवा मोबाइल फोन आणि पैसे देण्याचे वचन दिले होते” जर तिने तिच्या बहिणीला त्याच्यासोबत रात्र घालवू दिली. चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता म्हणून त्याने तिला मासेमारी परिसराच्या बाजूला सोडले.

Web Title: Merciless! 11-year-old girl raped by cousin's boyfriend; Put a stick in the private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.