#MeToo प्रकरण : पोलिसांनी संपूर्ण तपास केला नसून साक्षीदारांचे जबाब देखील अपुरे - वकील नितीन सातपुते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 05:04 PM2019-06-13T17:04:00+5:302019-06-13T17:11:08+5:30
अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे वकील नितीन सातपुते यांनी केला दावा
मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ता लैंगिक शोषणप्रकरणी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांना ओशिवरा पोलिसांनी मोठा दिलासा आहे. मात्र, तनुश्री यांचे वकील नितीन सातपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, बी समरी अहवालाबाबत पोलिसांकडून काहीही माहिती मिळाली नाही. माहिती कळविली जाईल, मात्र या अहवालाविरोधात आम्ही जाणार आहोत. पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या बचावाच्या मार्गाने हा तपास अपुरा केला असून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले नाहीत तर काहींचे अर्धवट जबाब नोंदविण्यात आले आहेत.
पुढे सातपुते यांनी सांगितले की, आम्ही ओशिवरा पोलिसांनी अंधेरी कोर्टात जो बी समरी अहवाल सादर केला त्याला विरोध करणार असून त्यानंतर सुनावणीत कोर्ट आमची बाजू ऐकून समाधानी झाल्यास पुन्हा याप्रकरणी तपस करण्याचे निर्देश देईल. हेअर ड्रेसरसह आठ साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदविले नाहीत. तसंच पोलिसांनी ज्यांचे जबाब नोंदविले त्यांना काहीच माहिती नाही आहे. पोलिसांनी याप्रकरणी पारदर्शक तपास केला नसून मुंबई हायकोर्टात देखील या अहवालाविरोध करत तपास अधिकाऱ्याविरोधात रीट याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
#MeTooतनुश्री दत्ता प्रकरण : पोलिसांनी संपूर्ण तपास केला नसून साक्षीदारांचे जबाब देखील अपुरे - वकील नितीन सातपुते https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2019
#MeToo प्रकरण : नाना पाटेकर यांना मोठा दिलासा