#MeToo : चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्कारप्रकरणी बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:32 PM2018-10-13T13:32:36+5:302018-10-13T13:33:10+5:30

पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझमीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

#MeToo: Filmmaker Haider Kazimila imprisoned for rape | #MeToo : चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्कारप्रकरणी बेड्या 

#MeToo : चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्कारप्रकरणी बेड्या 

googlenewsNext

मुंबई - तनुश्री दत्त प्रकरण चर्चेत असतानाच, एका भोजपुरी मॉडेलने एका निर्मात्यावर बलात्काराचा आरोप करत वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझमीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

काझमी हा हिंदी चित्रपट 'जिहाद'चा निर्माता आहे. काझमीने या मॉडेलसोबत चित्रपटाच्या सेटवर मैत्री करत तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने लग्नाला नकार दिला. तेव्हा त्याने बहीण अनिस काझमी हिची मदत घेत पीडितेला चहा पिण्यासाठी बोलावून घेतले. अनिस तिला काझमीकडे सोडून निघून गेली. याच दरम्यान पीडितेच्या शीतपेयांमध्ये त्याने गुंगीचे औषध घालून तुच्यावर बलात्कार केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. ९ ऑक्टोबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी या गुन्ह्यात काझमीला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्याची बहीण अनिस हीच शोध सुरु आहे. काझमीवर करण्यात आलेल्या आरोप खोटे असून निव्व्ल पैसे उकळण्यासाठी त्याला फसविले जात असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. भोजपुरी चित्रपटात 'आयटम सॉंग' करणाऱ्या मुलीला चित्रपटात काम करण्याची संधी काझमीने दिली आणि तिने त्याच्यावरच गुन्हा दाखल केला, असेही कुटुंबाने सांगितले. या प्रकरणी अधिक तपस सुरु असल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिली. 

Web Title: #MeToo: Filmmaker Haider Kazimila imprisoned for rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.