#MeToo : 'ती' घटना गोरेगावातली; पण तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी ओशिवरा पोलीसच करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:27 IST2018-10-11T15:10:04+5:302018-10-11T15:27:23+5:30
तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी गोरेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केली जाणार नसून त्याची चौकशी ओशिवरा पोलिसच करणार असल्याची खात्रीलायक माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली.

#MeToo : 'ती' घटना गोरेगावातली; पण तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी ओशिवरा पोलीसच करणार!
मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र, ही घटना गोरेगावात फिल्मीस्थान येथे घडली होती असल्याची माहिती तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले. त्यामुळे घटनास्थळ गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असल्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करणार असल्याची चर्चा होती. मात्र, तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी गोरेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केली जाणार नसून त्याची चौकशी ओशिवरा पोलिसच करणार असल्याची खात्रीलायक माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली.
#MeToo : नाना पाटेकरांसह चौघांवर होणार गुन्हा दाखल; बुरखा घालून तनुश्री ओशिवरा पोलीस ठाण्यात