लेडीज बार चालकावर मध्यरात्री केला गोळीबार; चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:21 IST2019-05-28T17:19:57+5:302019-05-28T17:21:46+5:30

घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

Midnight firing on Ladies bar owner; The driver injured | लेडीज बार चालकावर मध्यरात्री केला गोळीबार; चालक जखमी

लेडीज बार चालकावर मध्यरात्री केला गोळीबार; चालक जखमी

ठळक मुद्देव्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कोनगाव पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा हे समांतर तपास करीत आहेत.

 

भिवंडी - मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी कल्याण रस्त्यावरील रांजनोली नाका येथे स्वीट हार्ट लेडीज बार चालका वर रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने केला गोळीबार .जखमी बार चालकाचे नाव अमोल बोऱ्हाडे असं असून तो गोळी लागल्याने जखमी झाला आहे. त्यास ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोनगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

तालुक्यातील रांजनोली  ग्रामपंचायत हद्दीत स्वीट हार्ट नावाचे लेडीज बार असून सदरचा बार अमोल बोऱ्हाडे हे चालवत आहेत. २७ मेच्या मध्यरात्री नंतर अडीच वाजताच्या सुमारास अमोल बोऱ्हाडे हे सिगारेट पिण्यासाठी बारच्या मागील बाजूस येऊन उभे राहिले असता त्याठिकाणी आलेल्या अज्ञाताने त्यांच्यावर जवळून पिस्टल मधून गोळी चालविली. त्याच सुमारास अमोल बोऱ्हाडे हे मागे वळल्याने सदरची गोळी त्यांच्या उजव्या खांद्याच्या खालील बाजूने आरपार घुसुन समोरून बाहेर पडली .दरम्यान अमोल बोऱ्हाडे हे धावतच आपल्या बार मध्ये पळल्याने मारेकऱ्याने तेथून पळ काढला. राजनोली नाका परिसरात असलेल्या खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी ठाणे ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या  घटनेची माहिती मिळताच कोनगाव  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याचा पंचनामा केला आणि अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेतील अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कोनगाव पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा हे समांतर तपास करीत आहेत. दरम्यान, हल्ला कोणी आणि का केला हे अजून कळलेले नसून व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Midnight firing on Ladies bar owner; The driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.