समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी, तेल माफिया राजू पंडितसह दोघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 06:44 PM2018-10-04T18:44:05+5:302018-10-04T18:49:30+5:30
याप्रकरणी म्होरक्या राजू पंडित (वय ५०) आणि साथीदार सोनू उर्फ जमील मोहम्मद हुसेन कुरेशी (२१), मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक केली आहे.
मुंबई - समुद्रात तेलाची तस्करी करणाऱ्या बड्या माफियांनी पुन्हा तोंडवर काढण्यास सुरूवात केली आहे. समुद्रातून तेलाची तस्करी करणाऱ्या एका बड्या माफियाचा पोर्ट झोन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी म्होरक्या राजू पंडित (वय ५०) आणि साथीदार सोनू उर्फ जमील मोहम्मद हुसेन कुरेशी (२१), मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी समुद्रात पेट्रोल आणि डिझेलची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरू केल्यानंतर सराईत टोळ्यांनी मुंबईबाहेर तेल तस्करी सुरू करण्यास सुरूवात केली. सप्टेंबर महिन्यान पोलिस गणपतीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने मुंबईच्या समुद्रात एक मोठं जहाज तेल तस्करी करण्यास येणार होतं. देशात तेलाच्या वाढत्या किंमतीचा फायदा घेत तेल तस्करांनी पोलिसांची नजर चुकवून तेल तस्करी करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार गौरी-गणपती विसर्जनावेळेस पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याने ही टोळी समुद्रातून शेकडो लिटर तेल चोरी करत होती. गस्तीवर असलेल्या यलोगेट पोलिसांना लकडा बंदर जवळील समुद्रात सोमवार १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.४५ वाजता एक संशयित बोट आढळून आली. या बोटीवर कुणी नसल्याने पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना त्यात ७० लिटर डिझेल आढळून आलं.