परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 06:07 PM2018-10-17T18:07:57+5:302018-10-17T18:08:27+5:30

आरोपी अजय भवानीशंकर गुप्ता (वय २३), सेन्ड्रिक डॉमनिक रॉबर्ट (वय २३), विग्नेश सुरेश के. सी. (वय २२) आणि नेहा नरेंद्र पंचारिया (वय २३) यांना गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), २४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली आहे. 

Millions of rupees worth millions of rupees by showing lacquer job abroad | परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद 

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद 

मुंबई - परदेशात भरघोस पगाराचे आमिष दाखवून अनेक लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीतील आरोपी अजय भवानीशंकर गुप्ता (वय २३), सेन्ड्रिक डॉमनिक रॉबर्ट (वय २३), विग्नेश सुरेश के. सी. (वय २२) आणि नेहा नरेंद्र पंचारिया (वय २३) यांना गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), २४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली आहे. 

ऑगस्ट महिन्यात आखाती देशात नोकरी करून निवृत्त झालेल्या एक ज्येष्ठ नागरिकाला आर्थिक अडचणीमुळे पुन्हा परदेशात नोकरी करायची होती. त्यासाठी ते नोकरी शोधत होता. दरम्यान त्यांना फेसबुक पेजवर 'इंटरनॅशनल जॉब्स फ्री रिक्रुटमेंट' ही जाहिरात दिसली. या जाहिरात पोर्टलमध्ये कॅनडा, यु. एस.ए आणि यु. ए. ई. या देशांत भरघोस पगाराच्या विविध तांत्रिक पदांच्या जागा रिक्त असल्याबाबत माहिती देण्यात आली होती. ही माहिती पाहून ज्येष्ठ नागरिकाने जाहिरातकर्त्यांना संपर्क साधून त्यांना आपले सर्व महत्वाचे कागदपत्रे व्हॉट्स अॅप आणि ईमेल द्वारे पाठवली. त्यानंतर या नागरिकास कॅनडा येथे नोकरीस पाठवीत असल्याचे सांगितले. जाहिरातकर्त्यांनी स्वतः कॅनडा येथील उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करून या टोळीने विदेशी सिमकार्डच्या आधारे एक बनावट व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून त्यावर त्यांनी आतापर्यंत नोकरीस लावलेल्या लोकांचे फोटो, पासपोर्ट, व्हिसा वैगरे कागदपत्रे ग्रुपवर पाठवून अनेकांचा विश्वास संपादन केला. दरम्यान जाहिरातकर्त्यांनी वेगवेगळी करणे सांगून नोकरीसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकास १ लाख ५४ हजार रुपये ऑनलाईन डिपॉझिट करण्यास सांगितले. मात्र, जाहिरातकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नोकरी मिळवून दिली नाही. त्यानंतर या इसमाने भरलेले पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांना दमदाटी करत टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने गोरेगाव येथून या टोळीतील एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे जाहिरातीशी संबंधित कागदपत्रे  आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन आढळून आला. या आरोपावरून संपूर्ण टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. हे चारही आरोपी कर्नाटकातील असून त्यांनी बऱ्याच गरजू लोकांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला आहे. 

Web Title: Millions of rupees worth millions of rupees by showing lacquer job abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.