मन सुन्न करणारी घटना! पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून 1 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:29 PM2022-01-03T23:29:15+5:302022-01-03T23:30:03+5:30

Death Case :भिवंडीतील धक्कादायक घटना

A mind numbing event! 1 year old kid dies after drowning in a bucket full of water | मन सुन्न करणारी घटना! पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून 1 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

मन सुन्न करणारी घटना! पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून 1 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

Next

नितिन पंडीत

भिवंडी - घरात खेळता खेळता बाथरूम मध्ये जाऊन बाथरूममधील पाण्याने भरलेला बादलीत पडल्याने एका वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी शहरातील देऊनगर परिसरात येथे घडली आहे.या घटनेची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जर आपल्या घरात लहान मुले असतील तर गृहीणींनी जरा सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

दिलकैश अन्सारी (वय १ वर्ष) असे मयत चिमुरड्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी हा चिमुरडा घरात खेळत होता, तर त्याची आई किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती. तर त्याची इतर भावंडे टीव्ही बघण्यात व्यस्त होती. यावेळी चिमुरडा खेळता खेळता घरातील बाथरूम मध्ये गेला याठिकाणी पाण्याने भरलेला बादलीत पडला. हि दुर्दैवी घटना मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिने जीवाच्या आकांताने धावत पळत मुलाला डक्टरांकडे नेले. मात्र रविवार असल्याने अनेक डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने जवळपास तीन चार रुग्णालये फिरविल्या नंतर अखेर या चिमुरड्यास आईने  स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. 

          
मयत दिलकैश हा त्याच्या इतर भावंडांपेक्षा सर्वात लहान होता. या प्रकरणी मयत दिलकैशची आई शबाना अन्सारी (वय २९ वर्ष ) यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला असून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अंसारी परिवारावर काळाने घाला घातला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: A mind numbing event! 1 year old kid dies after drowning in a bucket full of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.