Anil Parab: कंत्राटदाराकडून वसुलीसाठीचे आदेश मंत्री परब यांचे नव्हेत; तर परमबीर सिंहचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 07:22 AM2021-08-22T07:22:31+5:302021-08-22T07:22:58+5:30
Parambir Singh: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने न्यायालयाने लिहिलेल्या पत्रातील मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मात्र त्यावेळी भीतीपोटी आपल्याला तक्रार असल्याचे अग्रवालने स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितले होते, त्यामुळे त्याने त्याबाबत माझ्याकडून सर्व माहिती घेतली होती, असा दावा बिमल अग्रवालने केला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने न्यायालयाने लिहिलेल्या पत्रातील मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मात्र त्यावेळी भीतीपोटी आपल्याला तक्रार असल्याचे अग्रवालने स्पष्ट केले आहे.
उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळील जिलेटीन कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंह याचे १०० कोटी वसुलीबाबतची प्रकरणात वाझेला अटक झाल्यानंतर त्याने एनआयए कोठडीतून कोर्टाला लिहिलेल्या पत्रात मंत्री अनिल परब यांनी बीएमसी कंत्राटदाराकडून वसुली करण्यास सांगितले असल्याचा खोटा आरोप केला, प्रत्यक्षात ती वसुली परमबीर सिंहसाठी केली जाणार होती, असे वाझेने सांगून माझ्याकडून सर्व कंत्राटदाराची माहिती घेतली होती. परमबीर, वाझे हे आपल्या जिवाचे बरे वाईट करतील, या भीतीपोटी आपण त्यावेळी तक्रार देण्याची हिम्मत झाली नव्हती, असे अग्रवालने म्हटले आहे.