पोलीस स्टेशनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, तरूणी म्हणाली - रेपची तक्रार नको; पोलिसासोबत लग्न लावून द्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 04:25 PM2021-03-10T16:25:54+5:302021-03-10T16:32:37+5:30
तरूणी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे मोठा ड्रामा झाला. तरूणीच्या या हायहोल्टेज ड्राम्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचा हा ड्रामा दिवसभर सुरू होता.
(Image Credit : Aajtak)
बिहारच्या हाजीपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर प्रेमाचा मोठा ड्रामा बघायला मिळाला. तरूणी फेसबुकवर एका तरूणाला भेटली आणि दोघांमध्ये प्रेम झालं. पण नंतर तरूणाने लग्न करण्यास नकार दिला. मग तरूणी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे मोठा ड्रामा झाला. तरूणीच्या या हायहोल्टेज ड्राम्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचा हा ड्रामा दिवसभर सुरू होता.
आजतक डॉट इनने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी-सकाळी तरूणी हाजीपूर महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने तिच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रियकरावर एक वर्षापासून लग्नाचं आमिष दाखवून रेप केल्याचा आरोप लावला. हा हाजीपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. तरूणीच्या या गंभीर तक्रारीनंतर महिला पोलीस स्टेशनच्या एएचओंनी लगेच आरोपी कॉन्स्टेबलला बोलवलं. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार)
पटण्याला राहणाऱ्या अल्पवयीन तरूणीने आरोप लावला आहे की, हाजीपूर पोलीस लाइनमध्ये तैनात कॉन्स्टेबलसोबत फेसबुकवर मैत्री झाली. आरोपी पोलिसाने पोलीस लाइनजवळ भाड्याने एक घर घेतलं होतं. तिथे दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते.
पीडित तरूणीने लावलेले गंभीर आरोप पाहता एसएचओंनी लगेच आरोपीला बोलवलं. त्यानंतर जे झालं त्याची कल्पना पोलिसानेही केली नसेल. पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर गोंधळ सुरू होता. पोलीस आरोपी विरोधात एफआयआर दाखल करण्यास तयार झाले. मात्र, पीडीत तरूणीने असं करण्यास नकार दिला आणि पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावून देण्याचा तगादा लावला होता.
अखेर परेशान झालेल्या एसएचओंनी तरूणीच्या कुटुंबियांची माहिती काढली आणि त्यांना नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशन येण्यास सांगितले. नंतर पोलिसांनी तरूणीला कुटुबियांकडे सोपवलं. आणि तर आऱोपीकडून लिखित पत्र घेऊन त्याला पोलीस लाइनला सोडलं.