अल्पवयीन मुलीवर अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक, आरोपीला अटक
By राजेश मडावी | Published: October 13, 2023 09:14 PM2023-10-13T21:14:27+5:302023-10-13T21:14:53+5:30
उमाकांत भावराव कॉलर (३० रा. गुरुनगर भद्रावती) असे आरोपीचे नाव
राजेश मडावी, चंद्रपूर: भद्रावती शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केले. तिला एक अपत्य झाले. मात्र लग्नास नकार दिल्याने पीडितेच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) आरोपीला अटक केली. उमाकांत भावराव कॉलर (३० रा. गुरुनगर भद्रावती) असे आरोपीचे नाव आहे.
उमाकांत कॉलर याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिला एका अपत्याला जन्म दिला. मात्र आरोपीने लग्नास नकार दिल्याने मुलीने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अत्याचार व पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे करीत आहेत.