टीव्ही पाहण्यासाठी शेजाऱ्यांकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 04:10 PM2019-12-25T16:10:23+5:302019-12-25T16:11:20+5:30
तिन्ही अल्पवयीन मुले 12 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जाते.
बिहार - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. रविवारी रात्री उशिरा आठ वाजताच्या सुमारास वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार करून तिची हत्या केली. कोणाला कळू नये म्हणून घाबरून मुलांनी तिचा मृतदेह फेकून दिला. तिन्ही अल्पवयीन मुले 12 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जाते.
सोमवारी सायंकाळी मृत मुलीच्या कुटुंबियांना दुष्कर्म करणाऱ्या अल्पवयीन मुलांना अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मृत मुलगी टीव्ही पाहण्यासाठी शेजारी जात होती. तेव्हा गावातील काही मुलांनी त्या मुलीला पकडले आणि बलात्कार केला. या घटनेविषयी कोणालाही कळू नये म्हणून आरोपींनी मुलीची हत्या केली.
रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा घरातील लोकांनी मुलीचा शोध सुरू केला. मात्र, मुलगी सापडली नाही. नंतर सकाळी स्थानिक चौकात पान दुकानात मुलीचा मृतदेह पाहून खळबळ माजली. त्यानंतर कुटुंबीयांनी मृत मुलीला घरी नेले आणि मृतदेह पुरला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी संशयावरून दोन मुलांना पकडून त्यांच्याकडे काटेकोरपणे विचारपूस केली, तेव्हा दोन्ही अल्पवयीन मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेत सामील असलेला तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. यानंतर कुटुंबीयांनी सोमवारी सायंकाळी पोलिसांत गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.