मोबाईलवरील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:49 PM2018-08-24T16:49:42+5:302018-08-24T16:50:36+5:30
मोबाईलवर न कळत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील राजेगाव येथे उघडकीस आली.
माजलगाव (बीड ) : मोबाईलवर न कळत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील राजेगाव येथे उघडकीस आली. याबाबत पिडीतेने गुरुवारी (दि.२४) रात्री ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
तालुक्यातील राजेगाव येथील महेश रवींद्र साळवे याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत नातेवाईकामार्फत ओळख करून घेतली. ही मुलगी औरंगाबाद येथे अकरावीचे क्लास करते. सुरवातीला महेशने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर नकळत तिचे फोटो मोबाईलवर काढून घेतले. यानंतर त्याने ते फोटो पिडीतेला दाखवले. तिने ते फोटो परत दे किंवा डिलीट करून टाकण्यास सांगितले. मात्र, महेशने तुला फोटो परत देतो त्यासाठी तू बजाज नगर (औरंगाबाद) येथील एका मित्राच्या खोलीवर येण्यास सांगितले. रूमवर आल्यावर फोटो पाहिजे असेल तर शारीरिक संबंध करू दे असे म्हणत महेश तिला ब्लॅकमेल करू लागला.
पिडीतेने त्यास विरोध केला असता महेशने तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी महेशने दिली. हा प्रकार पिडीतेने तिच्या आईवडिलांना सांगितला असता त्यांनी महेशचे वडील रवींद्र बाबुराव साळवे, आई सुमन रवींद्र साळवे यांच्या कानावर घातला. तेंव्हा मुलीचे लग्न महेशसोबत लाऊन देण्याची धमकी महेशच्या आईवडिलांनी दिली. बदनामीपोटी पिडीतेचे आईवडील शांत होते.
त्यानंतरही आरोपीने गावातील मित्रांना फोटो दाखवून पिडीतेच्या घरासमोर येऊन धमक्या देत बुधवारी (ता.२२) पुन्हा राजेगावात पिडीतेवर अत्याचार केला. गुरुवारी पिडीतेने ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश साळवे, रवींद्र साळवे, सुमन साळवे यांच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महेशला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे हे करत आहेत