उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची ४ महिन्यानंतर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 07:07 PM2022-03-29T19:07:49+5:302022-03-29T19:08:06+5:30

मुलीला बसला मानसिक धक्का

Minor girl released after 4 months, Police Arrested Accused | उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची ४ महिन्यानंतर सुटका

उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची ४ महिन्यानंतर सुटका

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात हिललाईन पोलिसाला यश आले. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याने लैंगिक अत्याचार केल्याने, मुलीला मानसिक धक्का बसला आहे. 

उल्हासनगर पूर्वेत राहणारी १६ वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शिकवणी साठी जातो म्हणून २६ नोव्हेंबर २०२१ रोजी घराबाहेर पडली. मात्र घरी परत न आल्याने वडिलांनी हिललाईन पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र गेल्या चार महिन्या पासून मुलीचा सुगावा लागला नाही. दरम्यान तुमच्या मुलीला परत आणायचं असल्यास ५० हजार रुपये द्या, अशी मागणी करणारा एक फोन मुलीच्या वडिलांना आला. याबाबतची माहिती वडिलांनी हिललाईन पोलिसांना दिल्यावर, पोलिसांनी सूत्र हलविले असता, मंगेश नावाच्या तरुणाने मुलीला अहमदनगर येथे पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मंगेश सोनावणे यांच्यासह मुलीला ताब्यात घेतले. तसेच मुलीला तीच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

 हिललाईन पोलिसांनी त्याच्यावर अपहरणासह बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला. अशी माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली. तसेच ५० हजाराची मागणी करणारा मंगेशचा मित्र असल्याचे उघड झाले. याप्रकारने मुलीला मानसिक धक्का बसला असून मुलीवर वैधकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्ह्या प्रकरणी झालेल्या संथ पोलीस तपासाबाबत पोलीस विभागावर सर्वस्तरातून टिका होत आहे.

Web Title: Minor girl released after 4 months, Police Arrested Accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.