खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:40 PM2024-05-17T16:40:59+5:302024-05-17T16:47:19+5:30

एका 13 वर्षीय मुलीने आपल्या दोन बहिणींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

minor killed her two sisters in bijnor police investigating the case | खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण

खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण

उत्तर प्रदेशमध्ये एका 13 वर्षीय मुलीने आपल्या दोन बहिणींची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मृत बहिणींचं वय 7 आणि 5 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान, एसपी नीरज कुमार जदौन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास नूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गौहावर जैत गावात दोन मुलींची हत्या झाल्याची माहिती मिळाली. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना तेथील एका घरात सहदेव आणि सविता यांच्या सात आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना कोणीही जबरदस्तीने घरात घुसल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव आणि सविता त्यांच्या 5 मुलांसह या घरात राहत होते. सविताने दोनदा लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न पुखराज नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. सविताची मोठी मुलगी (13) आणि तिची धाकटी मुलगी (9) या पुखराजच्या मुली आहेत. ज्या दोन मुलींची हत्या करण्यात आली त्या सविताचा दुसरा पती सहदेव यांच्या मुली होत्या. याशिवाय सविता आणि सहदेव यांना दीड वर्षांचा मुलगाही आहे. पोलिसांनी 13 वर्षांच्या मोठ्या मुलीची चौकशी केली.

पोलीस चौकशीत सुरुवातीला मोठ्या मुलीने सांगितलं की, दोन अनोळखी लोक घरात आले आणि त्यांनी दोन्ही बहिणींचा गळा दाबून खून केला. मात्र, नंतर तिने दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं कबूल केलं. एसपी नीरज कुमार जदौन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या मुलीने सांगितलं की, वडील मोठं कुटुंब असल्याने चिंतेत होते, म्हणून तिने दोन्ही बहिणींची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. दोन्ही मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 
 

Web Title: minor killed her two sisters in bijnor police investigating the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.