Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन माहिती आली समोर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही प्रकार कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 08:23 PM2023-06-12T20:23:27+5:302023-06-12T20:25:01+5:30

Mira Road Murder Case: पोलिसांच्या चौकशीद्वारे सदर घटनेतील आता नवनवीन खुलासे समोर येत आहे.

Mira Road Murder Case: New information in Saraswati Vaidya murder case; The incident was also caught in the CCTV camera | Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन माहिती आली समोर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही प्रकार कैद

Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन माहिती आली समोर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही प्रकार कैद

googlenewsNext

Mira Road Murder Case: मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटनेनं महाराष्ट्रासह देश हादरला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांच्या चौकशीद्वारे सदर घटनेतील आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. आरोपी मनोज साने याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात मयत सरस्वती वैद्यशी विवाह केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. पोलिसांना आरोपीच्या घरातून काही औषधं देखील मिळाली आहेत, त्याचा तपास आता नया नगर पोलीस करणार आहेत.

साने याने गुगलवर सर्च करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खरेदी केलेली यांत्रिक करवत बंद पडली असता, ती पुन्हा दुरुस्त करून घेतली होती. तसेच मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याने निलगिरीच्या पाच बाटल्या खरेदी केल्या होत्या, अशाप्रकारे सानेच्या कबुली जबाबातून अनेक नवनवीन खुलासे उघड होत आहेत. आरोपी मनोज साने राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो सरस्वतीच्या शरीराचे अवयव एका पिशवीत घेऊन जाताना दिसत आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याचंही सीसीटीव्हीतून समोर आलं आहे.

पोलिसांना घरातून सरस्वतीच्या शरीराचे ३० ते ३५ तुकडे सापडले होते. ते तुकडे जेजे रुग्णालयात जुळवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या पोटाचा, डोक्याचा काही भाग सापडलेला नाही. साने याने तुकडे कुकरमध्ये शिजवले व काही भाजल्याने बहुतांश हाडांवर मांस राहिलेले नाही. साने याने एका पिशवीतून मृतदेहाचे काही तुकडे बाहेर टाकले होते. ते चित्र अत्यंत भयावह होते. पोलिस साने याच्या जप्त केलेल्या मोबाइलची तपासणी करत आहेत. जेणेकरून पुढील तपास करणे सोपे होईल. साने हा काही महिलांशीही संपर्कात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सरस्वतीच्या व सानेच्या मोबाइलमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Mira Road Murder Case: New information in Saraswati Vaidya murder case; The incident was also caught in the CCTV camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.