VIDEO: पोलिसांचा बाप काढणाऱ्याला खाकी वर्दीचा इंगा; रस्त्यावर 'वर्दी उतरव' म्हणणारा अटकेनंतर ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:46 PM2021-07-08T23:46:04+5:302021-07-08T23:58:45+5:30

रस्त्यावर वाघ बनणाऱ्याची अटकेनंतर शेळी झाली; पोलिसांसमोर गयावया करू लागला

in miraroad man who threatens police constable on road starts crying after arrest | VIDEO: पोलिसांचा बाप काढणाऱ्याला खाकी वर्दीचा इंगा; रस्त्यावर 'वर्दी उतरव' म्हणणारा अटकेनंतर ढसाढसा रडला

VIDEO: पोलिसांचा बाप काढणाऱ्याला खाकी वर्दीचा इंगा; रस्त्यावर 'वर्दी उतरव' म्हणणारा अटकेनंतर ढसाढसा रडला

Next

मीरारोड -  नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला " थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन " व पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र त्यांची मस्ती उतरून चक्क ढसाढसा रडायला लागले. मीरारोड मध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. 

वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीजच्या सुमारास  मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रात मोटार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला. 

तोच तेथील एका दुकानातून अरुण रतन सिंग (३६ ) व त्याची पत्नी मीना (३३) रा. साई अंगण, रामदेव पार्क, मीरारोड हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाट्टेल तश्या धमक्या, शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तमाशा करू लागले. 

अरुणने तर तुझी वर्दी उतरव मग बघा तुला कसा चिरून टाकतो असे धमकावले. मीनाने तर, तुला विकून विकून गाडी दुरुस्त करेन अशी दमदाटी केली. लोकांची गर्दी जमली पण कोणी पुढे आले नाही. अखेर नया नगरचे पोलीस आल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण व मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

रस्त्यावर हिरोगीरी करणाऱ्या अरुण ला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात अटक करताच तो ढसाढसा रडू लागला. त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचचा असे दोन्ही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांना गयावया करून दोघेही नवरा - बायको माफी मागून पुन्हा असे करणार नाही म्हणून विनवण्या करत होते.

Read in English

Web Title: in miraroad man who threatens police constable on road starts crying after arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.