भिक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख मिळाले, अशी राबवली गेली शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:02 AM2021-05-26T10:02:40+5:302021-05-26T10:03:13+5:30

वैद्यनाथ मंदिर परिसरात एका ८० वर्षांच्या भिक्षेकरी व्यक्तीजवळील जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली पिशवी अचानक गायब झाल्याचा प्रकार घडला.

The missing beggar got Rs 1.75 lakh | भिक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख मिळाले, अशी राबवली गेली शोधमोहीम

भिक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख मिळाले, अशी राबवली गेली शोधमोहीम

Next

 परळी (बीड) :   येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात एका ८० वर्षांच्या भिक्षेकरी व्यक्तीजवळील जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली पिशवी अचानक गायब झाल्याचा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी त्यांनी शहर ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याचा छडा लावत रोकड त्यांना मिळवून दिली. मोलमजुरी करून आणि भिक्षा मागून त्याने हे पैसे जमवले होते. 
 येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे हे भाविकांकडून भिक्षा मागत असतात. त्यांना दोन मुले, सुना, एक मुलगी असा परिवार आहे. मुले वीटभट्टीवर कामास आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांनी शहर पोलीस ठाणे येथे येऊन आपली पैशाची पिशवी गायब असल्याची तक्रार रडत केली होती. पोलिसांनी नाईकवाडे यांना सोबत नेऊन, ते कुठे बसत होते, कुठे झोपत होते, कुठे राहत होते, याची पाहणी केली. वैद्यनाथ मंदिराजवळील रामनगर तांडा येथे छोट्याशा खोलीत ते राहतात. त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, काही किलोमीटर अंतरावर एक पिशवी आढळून आली. त्यातील पैसे मोजले असता, १ लाख ७२ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यामध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा होत्या. ही सर्व रक्कम नाईकवाडे यांना सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, पैशाची पिशवी कशी गायब झाली, याचे कोडे मात्र कायम आहे.

Web Title: The missing beggar got Rs 1.75 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.