बार्शीटाकळी येथून बेपत्ता झालेली युवती पुण्यात सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 11:24 IST2021-07-04T11:23:58+5:302021-07-04T11:24:11+5:30
The missing girl from Barshitakali was found in Pune : मुलीची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

बार्शीटाकळी येथून बेपत्ता झालेली युवती पुण्यात सापडली
अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या एका युवतीचा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे शोध लावला. या युवतीस बार्शीटाकळी येथे परत आणण्यात आले आहे.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती २०२० मध्ये बेपत्ता झाली होती. हा गुन्हा एक वर्षापासून प्रलंबित होता. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे या प्रकरणाचा तपास आला. या प्रकरणाचा तपास करताना पीडित मुलगी ही तळेगाव दाभाडे येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून कक्षाने तातडीने पुणे गाठून युवतीस ताब्यात घेतले. त्यानंतर तिला अकोल्यात आणण्यात आले. मुलीची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती ताठे, महेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुलभा ढोले, अंमलदार विजय खर्चे, सूरज मंगरूळकर, पूनम बचे, देवानंद खरात, वासुदेव लांडे यांनी केली.