बेपत्ता चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:45 AM2020-06-15T05:45:31+5:302020-06-15T05:46:01+5:30

डोक्यावरच्या गोणीमुळे गुन्ह्याचा उलगडा

Missing girl child murdered after sexual assault | बेपत्ता चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या

बेपत्ता चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या

Next

मुंबई : घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याची माहिती आरोपीच्या अटकेनंतर समोर आली आहे. रविवारी वाडी बंदर येथे रेल्वे रुळात फेकलेल्या एका गोणीतून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

डोंगरी परिसरात ७ वर्षीय चिमुरडी कुटुंबियासोबत राहायाची. ३० मे रोजी रात्री साडे नउच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. अखेर, तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पथकाने सीसीटिव्हीची मदतीने तपासणी सुरु केली. बऱ्याच तपासणी नंतर एका सीसीटिव्हीमध्ये एक तरुण चिमुरडीसोबत एक मिनिट बोलताना दिसला. पोलिसांनी तोच धागा पकड़ून शोध सुरु केला. पुढे त्याच दिवशी तोच तरुण रात्री डोक्यावर गोणी घेवून जाताना दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तरुणाचा शोध घेतला असता, त्याचे नाव रिझवान क़ुतबुद्दीन शेख (२२) असून तो परिसरालगत असलेल्या एका इमारतीत आचारी म्हणून काम करत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी शेखचा तपास सुरु केला. तेव्हा तो मित्राच्या तिकीटावर गावी गेल्याचे समोर आले. पथकाने त्याच्या गावी निरोप धाङताच, १३ तारखेला तो पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने हत्येची कबुली दिली. आणि गावी जाण्यापूर्वी मृतदेह वाडी बंदर रेल्वे ट्रॅक शेजारी तंबाखु गल्लीच्या आतील रोडमध्ये फेकल्याचे सांगितले. त्यानुसार रविवारी चिमुरडीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत, शवविच्छेदनास पाठविला आहे.

शनिवारपर्यंत कोठडी
लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या हत्या, पॉक्सोच्या गुन्ह्यांत शेखला अटक केली असून, २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Missing girl child murdered after sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.