डायनासॉरच्या मूर्तीतून येत होती दुर्गंधी, बाप-लेकाने तक्रार केली तर समोर आलं भयानक रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:05 PM2021-05-27T12:05:16+5:302021-05-27T12:09:54+5:30
ही घटना आहे बार्सिलोनाची. इथे एका वडील आणि मुलगा डायनासॉरजवळ उभे होते. त्यांना त्यातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याची तक्रार केल्यावर असं रहस्य समोर आलं की, पोलिसही हैराण झाले.
डायनासॉरची प्रजाती अनेक वर्षाआधी लुप्त झाली आहे. पण आजही त्यांच्या विशाल मूर्ती त्यांच्या असण्याचा विश्वास देतात. डायनासॉरचे अनेस स्टॅच्यू संग्रहालयात आणि सार्वजनिक ठिकाणी बघायला मिळतात. लोक त्यांच्यासोबत सेल्फीही घेतात. मात्र, स्पेनमधून डायनॉरच्या स्टॅच्यूसंबंधी एक अशी घटना समोर आली आहे ज्याबाबत समजल्यावर लोक हैराण झाले. ही घटना आहे बार्सिलोनाची. इथे एका वडील आणि मुलगा डायनासॉरजवळ उभे होते. त्यांना त्यातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याची तक्रार केल्यावर असं रहस्य समोर आलं की, पोलिसही हैराण झाले.
बार्सिलोनाच्या क्यूबिक बिल्डींगच्या बाहेर डायनासॉरचा एक स्टॅच्यू आहे. २२ मे म्हणजे शनिवारी एका वडिलाला आणि त्याच्या मुलाला स्टॅच्यूमधून दुर्गंधी आली. आधी तर त्यांना समजलं नाही की, स्टॅच्यूमधून दुर्गंधी काय येतीये. नंतर त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी चेक केलं तर मूर्तीमध्ये एक मृतदेह आढळून आला. समोर आलं की, मृतदेह कॉलनीतीलच एका ३९ वर्षीय व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तो बेपत्ता असल्याची तक्रारही देण्यात आली होती.
ही मूर्ती बार्सिलोनाच्या Santa Coloma de Gramenet मध्ये स्थित आहे. स्थानिक मीडियानुसार, या व्यक्तीचा मृतदेह स्टॅच्यूच्या पायात सापडला. ही घटना एक दुर्घटना वाटत आहे. ही हत्या नाही. ही व्यक्ती मूर्तीच्या पायात घुसली आणि तिथेच अडकली. असं वाटतं तो त्याच्या मोबाइल काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मोबाइल आत पडला होता. तो आधी मूर्तीच्या डोक्याकडून आत गेला आणि नंतर बाहेर येऊ शकला नाही. आतच अडकून पडला.
मृतदेह काढण्यासाठी बचाव दलाची मदत घेण्यात आली. त्यांनी डायनासॉरची मूर्ती कापून व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. हे समजू शकलं नाही की, मृतदेह किती दिवसांपासून आत पडून होता. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत आहेत. सोबतच लोकांनी मूर्ती तेथून बाजूला केली आहे. जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये.