तुमच्या नकळत कसे गहाळ होतात बॅंकेतून पैसे? जाणून घ्या एटीएम कार्ड स्किमिंगबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:10 AM2021-08-13T06:10:24+5:302021-08-13T06:10:45+5:30

तुमच्या नकळत तुमच्या एटीएममधून पैसे निघाले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही... आपण एटीएम न वापरताच पैसे कसे काढले गेले? असा प्रश्न पडेलच...

Missing money from a bank without your knowledge know about atm card | तुमच्या नकळत कसे गहाळ होतात बॅंकेतून पैसे? जाणून घ्या एटीएम कार्ड स्किमिंगबद्दल

तुमच्या नकळत कसे गहाळ होतात बॅंकेतून पैसे? जाणून घ्या एटीएम कार्ड स्किमिंगबद्दल

googlenewsNext

तुमच्या नकळत तुमच्या एटीएममधून पैसे निघाले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही... आपण एटीएम न वापरताच पैसे कसे काढले गेले? असा प्रश्न पडेलच... पण असे झाले असेल तर लक्षात घ्या, तुमच्या एटीएम कार्डचे डुप्लिकेट कार्ड तयार झाले आहे आणि त्याद्वारे पैसे काढले गेले आहेत. लगेच एटीएम ब्लॉक करा... 

मोडस ऑपरेंडी काय?
हे स्किमिंग उपकरण ग्राहकाने एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्याचे कार्ड इन्सर्ट करताच त्यातील डिटेल्स चोरते. ग्राहकाच्या नकळत त्याचा पिनही चोरला जातो. 
काहीवेळा गुन्हेगार तुम्हाला मदत करण्याच्या बहाण्याने तुमचा पिन कॉपी करतात.

बदमाश लोक एटीएम मशिनमध्ये स्किमिंग उपकरण स्थापित करत असल्याचे आढळून आले आहे. 
त्यानंतर या सर्व माहितीचा वापर डुप्लिकेट कार्ड तयार करण्यासाठी केला जातो आणि त्यानंतर मग चोरीचे सत्र सुरू होते.

काय काळजी घ्यावी?
एटीएम केंद्रात गेलात की मशीनची नीट तपासणी करा. कुठेही कोणतेही उपकरण स्थापित नाही ना याची खातरजमा करा.
तुमचा पिन एन्टर करतेवेळी दुसऱ्या हाताने कीबोर्ड झाका. म्हणजे तुमच्या बाजूला कोणी उभे असल्यास त्याला पिन समजणार नाही. 
एटीएम केंद्रात अन्य कोणी अनोळखी व्यक्ती असेल तर कोणताही व्यवहार करणे टाळा. 

Web Title: Missing money from a bank without your knowledge know about atm card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम