घरातून पळून जाऊन मैत्रीणीसोबत लिव-इनमध्ये राहू लागली तरूणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 03:59 PM2021-08-19T15:59:29+5:302021-08-19T16:01:17+5:30

पोलिसांनी सांगितलं की, बेपत्ता तरूणी बीएची विद्यार्थीनी आहे आणि ती रामपूर जिल्ह्यातील स्वार येथील तिच्या मैत्रीणीसोबत तिच्या घरी आपल्या इच्छेने राहत आहे.

Missing Noida girl found in live in relation with MA student in Rampur cops say cant interfere in their decision | घरातून पळून जाऊन मैत्रीणीसोबत लिव-इनमध्ये राहू लागली तरूणी आणि मग...

घरातून पळून जाऊन मैत्रीणीसोबत लिव-इनमध्ये राहू लागली तरूणी आणि मग...

Next


उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये कथितपणे बेपत्ता १९ वर्षीय तरूणी रामपूर जिल्ह्यात तिच्या एका तरूणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहताना आढळून आली. तरूणीच्या घरातील लोकांनी जुलैमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तरूणी म्हणाली की, ती तिच्या मर्जीने मैत्रीणीसोबत राहत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी सांगितलं की, बेपत्ता तरूणी बीएची विद्यार्थीनी आहे आणि ती रामपूर जिल्ह्यातील स्वार येथील तिच्या मैत्रीणीसोबत तिच्या घरी आपल्या इच्छेने राहत आहे.

स्वार सर्कल अधिकारी धरम सिंह मरचालने पीटीआयला सांगितलं की, 'काही दिवसांच्या शोधानंतर तरूणी नुकतीच जिल्ह्यातील शाहबाद भागात तिच्या मैत्रीणीसोबत राहत असल्याचं आढळून आलं. तिची मैत्रीण एम.ए ची विद्यार्थीनी आहे. तरूणीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं. तिने अधिकाऱ्यांना सांगितलं की, ती तिच्या मर्जीने तिच्या मैत्रीणीसोबत राहत आहे'. (हे पण वाचा : Shocking! निर्दयी पतीने उकळत्या पाण्याने घातली पत्नीला आंघोळ, कारण वाचून हैराण व्हाल)

ते म्हणाले की, दोन्ही विद्यार्थीनीच्या परिवारांना चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं. तिथे तरूणीने ती मैत्रीणीसोबत राहत असल्याचं सांगितलं. अधिकारी म्हणाले की, दोन्ही तरूणी वयस्क आहेत आणि अशात पोलीस त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. कोर्टाने अशा कपल्सना कायदेशीर मान्यता दिली आहे. 
 

Web Title: Missing Noida girl found in live in relation with MA student in Rampur cops say cant interfere in their decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.