बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदाराला पाहिजे पीडितेचा जन्मदाखला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:15 PM2019-08-29T20:15:08+5:302019-08-29T20:16:46+5:30

पीडिता मुलगी ही अल्पवयीन नाही असा त्यांचा दावा असून गुरूवारो सोमवारी सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले. 

The MLA accused in the rape case wants the victim's birth certificate | बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदाराला पाहिजे पीडितेचा जन्मदाखला

बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदाराला पाहिजे पीडितेचा जन्मदाखला

googlenewsNext
ठळक मुद्देमोंसेरात यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. पीडितेच्या वयासंबंधी अनिश्चीतता निर्माण झाली होती तेव्हा तिचे वय तपासम्यासाठी वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती.

पणजी - अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अडकलेले भाजप आमदार बाबूश मोंसेरात यांना बलात्कार पीडितेचा जन्मदाखला पाहिजे आहे. पीडिता मुलगी ही अल्पवयीन नाही असा त्यांचा दावा असून गुरूवारो सोमवारी सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले. 
पीडित मुलीच्या आईने अपना घरमध्ये दिलेल्या मुलीच्या  जन्मदाखल्यानुसार ती अल्पवयीन नसल्याचे मोंसेरात यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. मोंसेरात यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. पीडितेच्या वयासंबंधी अनिश्चीतता निर्माण झाली होती तेव्हा तिचे वय तपासम्यासाठी वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. या चाचणीच्यावेळी तिचे वय १८ वर्षे वयापेक्षा कमी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कायद्याने तिला अल्पवयीन ठरविले होते. 
२०१६ सालच्या या प्रकरणात मोन्सेरात यांना अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली होती. मुलीला गुंगीचे पेय प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.  या प्रकरणात तिच्या आईचाही सहभाग असल्याच्या कारणावरून तिलाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे मुलीला अपना घरात ठेवण्यात आले होते.या प्रकरणात तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.  १२ जून रोजी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्याचा आदेश सत्र न्यायायाने ३ जून रोजी दिला होता. गुरूवारी त्यांच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते, परंतु पीडितेच्या जन्मदाखल्याचा नवीन मुद्दा उपस्थित केल्यामुळे आता पुढची तारीख देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपूर्वी पोलिसांना या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Web Title: The MLA accused in the rape case wants the victim's birth certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.