आमदार गीता जैन यांचे बनावट Whats App वरून पैशाची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 08:55 PM2021-06-29T20:55:06+5:302021-06-29T20:57:49+5:30
Fake Whats App of MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांचे कार्यकर्ते रवींद्र किमराज जैन यांना त्यांच्या ओळखीचे असलेले राहुल अग्रवाल यांच्या मोबाईलवर Whats App मॅसेज आला.
मीरारोड - मीर भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावाने बनावट Whats Appद्वारे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईल क्रमांक धारकवर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार गीता जैन यांचे कार्यकर्ते रवींद्र किमराज जैन यांना त्यांच्या ओळखीचे असलेले राहुल अग्रवाल यांच्या मोबाईलवर Whats App मॅसेज आला. आ. गीता यांचे छायाचित्र असलेल्या त्या व्हॉट्स एप वरून अग्रवाल यांना, फोन पे किंवा गुगल पे वापरता का ? मला काही पैश्याची गरज आहे. हा मॅसेज कोणालाही दाखवू नका व कोणाला सांगू नका असे मॅसेजमध्ये म्हटले होते.
अग्रवाल यांना संशय आल्याने त्यांनी सदर प्रकार जैन यांना कळवळा
जैन यांचे खाजगी स्वीय सहाय्यक राजेश बरकडे यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या आधी शहरातील काही बड्या लोकांचे फेसबुक चे बनावट खाते उघडून पैसे मागण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.