182 महिलांसोबत शरीरसंबंध ठेवून MMS बनविले; बड्या उद्योगपती घराण्यातील दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:28 PM2020-01-30T22:28:09+5:302020-01-30T22:30:13+5:30
या प्रकरणात या दोन्ही उद्योगपतींच्या घरातील सामिल मुलांसह नोकरालाही अटक करण्यात आली आहे.
कोलकाता - कोलाकातामध्ये एक सेक्स रॅकेटसारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. बुधवारी दोन उद्योगपतींच्या मुलांना सेक्स ब्लॅकमेल रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांवर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याच्या सेक्स क्लिप म्हणजेच एमएमएस बनवल्याचा आरोप आहे. या एमएमएसच्या सहाय्याने पीडित महिलांकडून पैसे उकळण्याचा धंदा या दोघांनी सुरु केला होता. या प्रकरणात या दोन्ही उद्योगपतींच्या घरातील सामिल मुलांसह नोकरालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून ही दोन मुले हे रॅकेट चालवत होते. त्याच्यांकडे १८२ महिलांच्या सेक्स क्लिप (एमएमएस) सापडले आहेत. तीन महिने केलेल्या तपासानंतर पोलिसांनी आदित्य अग्रवाल आणि अनीश लोहारूका यांना अटक केली आहे. दोघांचे वय २० वर्ष असून त्यांना मदत करणाऱ्या कैलाश यादव नावाच्या नोकराला देखील अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींनी महिलांशी मैत्री करत त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचे कबुल केले. आदित्य आणि अनीश वेगवेगळ्या महिलांसोबत मैत्री करत त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना आपल्या घरी किंवा हॉटेलवर भेटायला बोलवत. तेथेच कॅमेरा लपवून या महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे चित्रीकरण करून करत. त्यानंतर रेकॉर्ड केलेले हे व्हिडीओ आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवत. काही दिवसांनंतर हेच व्हिडीओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळत असत. अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडी होती.
आदित्य अग्रवाल हा कोलाकातामधील सर्वात मोठे कपड्यांचे दुकान असलेल्या व्यवसायिकाच्या घरातील आहे. तर, अनीश लोहारूकाच्या वडिलांचा रिअल इस्टेट आणि हॉटेल व्यवसाय आहे. तिन्ही आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. लोहारूका कुटुंबातील एका व्यक्तीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत अनीशला या सगळ्यात त्याला गुंतवल्याचे जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला. टाईम्स ऑफ इंडियाने व्हॉट्स अॅप देखील मेसेज केला. मात्र त्याला कुटुंबीयांनी उत्तर दिले नाही. तसेच एका महिलेने या दोघांवर १० लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.
पोलीसांनी अनिशचा लॅपटॉप जप्त केल्यानंतर त्यात १८२ सेक्स क्लिपचे फोल्डर आढळून आले. प्रत्येक फोल्डरमध्ये महिलेचे नाव देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात २०१३ पासूनचे एमएमएस क्लिप आहेत. सध्या पोलिसांनी लॅपटॉप आणि त्यामधील सेक्स क्लिप्स हस्तगत केल्या असून पुढील तपासासाठी लॅपटॉपला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.