मनसे आमदार राजू पाटील हे ईडी कार्यालयात गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:28 PM2021-07-07T15:28:14+5:302021-07-07T15:42:07+5:30
MNS MLA Raju Patil visit to ED Office : एका प्रकरणातील साक्षीदार म्हणून ईडी कार्यालयात गेल्याची आमदार राजू पाटील यांची माहिती
कल्याण - मनसेचे आमदार राजू पाटील हे आज ईडीच्या कार्यालयात गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पण त्यांच्याच एका प्रकरणात ते ईडी कार्यालयात साक्षीदार म्हणून गेलो होतो अशी माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
2015 साली मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांना अटक केली होती. विपीन पाटील याने मनसेते नेते आणि विद्यमान आमदार पाटील यांच्याकडे खंडणीची सुपारी कुख्यात डॉन रवी पूजारी याला दिली असल्याच्या आरोप आहे. प्रकरणात ईडीने मनसे आमदार पाटील यांना 23 जून रोजी समन्स बजावले होते. पाटील यांनी 23 जून रोजी त्यांची साक्ष दिली होती. मात्र ते काही निमित्त पुन्हा बाहेर जाणार असल्याने ईडी कार्यालयात माझी काही गरज आहे का हे विचारण्यासाठी स्वत:हून गेले होते. मात्र त्यांची आज काही देखील विचारपूस झाली नाही. ही माहिती स्वत: पाटील यांनी दिली आहे.
राजू पाटील यांच्याकडे खंडणीची सुपारी देणारा विपीन पाटील हा डोंबिवलीचा आहे. विपीन आणि दयानंद जाटान या दोघांवर गंभीर आरोप आहे की, ठाणे जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीकडे जास्त पैसा आहे. कोणत्या बिल्डरेच काम कुठे सुरु आहे. कोणता नेत्याला धमकी दिल्याने फायदा होईल ही सर्व माहिती कुख्यात डॉन रवी पूजारीला हे दोघे देत होते. ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणते गुन्हेगार आपल्यासाठी कामाला येऊ शकतात. याची चिठ्ठा ही ते पुरवित होते. या प्रकरणात दोघांना 2015 साली अटक झाली होती. सध्या रवी पूजारीला अटक करुन भारतात आणले गेले आहे. रवी पूजारीशी संबंधित सगळ्य़ा गुन्हयांचा तपास सुरु आहे. या तपासा दरम्यानच राजू पाटील यांच्याकडे खंडणीची सुपारीचे प्रकरणी ते स्वत: साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांची साक्ष झाली आहे. ईडी कार्यालयात जाण्यामागे कुठलेही आर्थिक प्रकरण नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.