उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:26 PM2019-08-22T17:26:47+5:302019-08-22T17:28:06+5:30
घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर - विधानसभा निवडणुक डोळयासमोर ठेवून भाजप सरकारने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडी चौकशीच्या आड अडचणीत आणण्याचा डाव आखल्याचा आरोप शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी करीत लालचक्की चौकात काळे कपडे घालून निषेध केला. तसेच घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली आहे.
उल्हासनगरातमनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कारवाई सुरू असल्याच्या पाश्वाभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कॅम्प नं 4 येथील लालचक्की चौकात मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन कदम, प्रदीप गोडसे आदी पक्ष पदाधिकारी काळे कपडे घालून एकत्र येत भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली. लोकसभा निवडणूक दरम्यान ई.व्ही.एम. मशीनसह अनेक प्रश्न मांडून भाजप सरकारची पोलखोल पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली. हा राग मनात धरून भाजपा सरकारने, गेल्या 30 वर्षा पूर्वीचे कोहिनूर प्रकरण निकाली लागले असतानाही जुने प्रकरण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा डाव खेळल्याचा आरोप बंडू देशमुख यांनी केला.
भाजपा सरकारने चौकशीसाठी ईडी मार्फत पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावणे केल्याने ठाकरे सर्मथकांत संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी उल्हासनगर पक्ष प्रमुख बंडू देशमुख, ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर कँम्प.न.चार येथील लालचक्की चौक परीसरात पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपा-युती सरकारच्या विरोधात काळे कपडे परिधान करीत घोषणाबाजी केली. तसेच आक्रमक आंदोलन केले. दरम्यान विठ्ठल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या पोलीस पथकाने प्रदीप गोडसे, सचिन कदम, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मैनुद्दीन शेख,सागर चौहान, कळू थोरात, सुभाष हटकर अनिल गोधडे, राजेश महेश्वरी,जितू शेट्टी,हिरा महेश्वरी यांना अटक केली. तर काही पक्ष पदाधिकाऱ्यांना उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.