मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:33 PM2020-08-07T17:33:35+5:302020-08-07T17:46:40+5:30
चौकशीसाठी पोलिसांना अजून हवा होता रिमांड, पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
ठाणे : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आज जामीन मंजूर झाला. लवकरच ते कारागृहातून मुक्त होणार आहे. चौकशीसाठी जाधव यांना जामीन देण्यात येऊ नये या आशयाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
कोविडदरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ठाणे पालिका मुख्यल्यासामोर पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे सेशन न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र कापूरबावडी पोलिसांनी अतिवृष्टीचे करण पुढे करत तसेच पोलीस रिपोर्ट न्यायालयात सादर न केल्याने न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्जावर सुनावणी करण्याचे निश्चित केले.
शुक्रवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पोलिसांच्या वतीने जाधव यांची चौकाशीसाठी आणखीन वेळ पाहिजे होता असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळली. त्यानंतर सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांचा युक्तीवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्हयांवर युक्तीवाद करण्यात आला. जाधव यांना जामीन दिल्यास पुन्हा आशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केलेला. तर अविनाश जाधव यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतर कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचे राजूरकर यांनी न्यायालयात मांडले. अखेर न्यायालयाने अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार
बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला