बिबवेवाडी भागात टाेळक्याने फाेडली वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:22 PM2018-07-03T12:22:34+5:302018-07-03T12:24:08+5:30

पुण्यातील बिबवेवाडी भागात साेमवारी रात्री 15-20 जणांच्या टाेळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची ताेडफाेड केली.

mob distroyed vehicles in bibvewadi | बिबवेवाडी भागात टाेळक्याने फाेडली वाहने

बिबवेवाडी भागात टाेळक्याने फाेडली वाहने

Next

पुणे : पुणे शहरात रात्रीच्या वेळी वाहने फाेडण्याचे सत्र सुरुच असून साेमवारी रात्री 10-15 जणांच्या टाेळक्यानी बिबवेवाडी परिसरातील वाहनांची ताेडफाेड केली अाहे. यात स्थानिक नागरिकांच्या वाहनांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले अाहे. याप्रकरणी बिबवेवाडी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

 
    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साेमवारी रात्री 12.30 च्या सुमारास बिबवेवाडी परिसरातील पद्मावती नगर भागातील नागरिकांच्या रस्त्यावर लावण्यात अालेल्या वाहनांची ताेडफाेड 10 ते 15 जणांच्या टाेळक्याने केली. यात कार, रिक्षा, टेम्पाे यांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले अाहे. रस्त्याव उभी असलेली 15 ते 16 वाहनं या टाेळक्याने फाेडली. ताेडफाेडीचा अावाज येताच नागरिक घराबाहेर अाले असता ही टाेळकी वाहने फाेडतच पुढे निघून गेली. याप्रकरणी बिबवेवाडी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला असून पाेलीसांनी एका संशयिताला चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे. त्याच्याकडून इतरांची माहिती मिळण्याची शक्यता अाहे. 


    दरम्यान पुणे व पिंपरी चिंचवड शहरात टाेळकी सातत्याने नागरिकांच्या वाहनांचे नुकसान करीत असून पाेलीसांचा कुठलाही वचक यांच्यावर राहिला नसल्याचे चित्र अाहे. गेल्या काही महिन्यात ताेडफाेडीच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी पाेलीस प्रशासन या घटनांकडे फारसे गंभीरतेने पाहत नसल्याचा अाराेप स्थानिक नागरिक करीत अाहेत. शहर व उपनगरात दहशत निर्माण करण्यासाठी टाेळकी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभी असलेली वाहने फाेडत अाहेत. यात नागरिकांच्या वाहनांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान हाेत असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. त्यामुळे हे ताेडफाेडीचे सत्र थांबणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

Web Title: mob distroyed vehicles in bibvewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.